Posts

Showing posts from June, 2020

छत्रपती शिवाजी महाराजांची बलस्थाने

Image
◆ शिवरायांची बलस्थाने "परराष्ट्रीय धोरण" - भाग ५ ◆ ▶शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? याबाबत काही जाबते आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. त्यांनी 'अरिमित्र विचक्षणा' कशी केली होती? स्वराज्य सुरवातीपासूनच चहुकडून शत्रुपक्षाने घेरलेले होते आणि राज्याला अंतर्गत शत्रू देखील खूप होते. ह्या दृष्टीने राजांनी परराष्ट्रीय धोरण कसे ठरवले आणि कसे राबवले हे समजून घेणे महत्वाचे आहे. अरि म्हणजे शत्रू किंवा जवळ ज्याचे राज्य तो. तर मित्र म्हणजे अर्थात सुहृदय.  ▶कौटिल्य अरिमित्राचे ६ प्रकार सांगतो. १. सहज शत्रू - राजाचे नातलग आणि सिमेलगतचे राष्ट्र. २. कृत्रिम शत्रू - आपल्या विरोधात जाउन इतर राज्यांना सुद्धा विरोध करण्यास भाग पाडणारा. ३. सहज मित्र - सिमेलगतचे राष्ट्र सोडून अन्य राज्यांचा राजा. ४. कृत्रिम मित्र - लाभ संपादन करण्याच्या दृष्टीने मैत्री ठेवणारा. ५. मध्यम - संधीविग्रहात अनुकूल असलेला. ६. उदासीन - बलवान असून मैत्री ठेवणारा. स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सहज शत्रू राष्ट्र होते. शिवाय मुघल सुद्धा स्वराज्याचे सहज शत्रू होतेच. ...

छत्रपती शिवाजी महाराजांची बलस्थाने

Image
◆ शिवरायांची बलस्थाने "युध्दतंत्र" - भाग ४ ◆ ▶मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.'  याला दिले गेलेले नाव म्हणजे 'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय??? हे नाव कोणी ठेवले? कसे पडले? म्लेच्छांसाठी गनिम म्हणजे मराठे. तर कावा म्हणजे कपटाने केलेला हल्ला.  थोडक्यात शत्रुने आपल्या लढाईच्या पद्धतीला दिलेले हे नाव इतकी ढोबळ माहिती आपल्या सर्वांना असते. पण मराठ्यांचे युद्ध तंत्र इतकेच होते का??? ह्याच तंत्रावर त्यांनी साल्हेरी पराक्रम गाजवला??? दक्षिण दिग्विजय फत्ते केला? पुढे दिल्लीवर कब्जा मिळवला??? उत्तर अर्थात 'नाही' हेच आहे. मराठ्यांचे स्वतःचे असे एक विकसीत तंत्र होते. त्याबद्दल आपण थोड़ी माहिती घेउया पण त्याआधी 'गनिमी कावा' या शब्दाबद्दल थोड़े अधिक जाणून घेउया. ▶कावा म्हणजे कपट, हुलकावणी असे त्याचे सरळ अर्थ असले तरी त्याचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे 'घोड्याची रग जिरवण्यासाठी त्यास वेगाने घ्यावयास लावलेले फेरे'.  अधिक स्पष्टपणे सांगायचे तर घोड़ा वेगाने वाटेल तसा वळवणे, फिरवणे आणि ...

छत्रपती शिवाजी महाराजांची बलस्थाने

Image
◆ शिवरायांची बलस्थाने "लष्करी व्यवस्था"- भाग ३ ◆ गेल्या २ भागात आपण पाहिले की छत्रपति शिवरायांनी मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती वापरून तिसरे बलस्थान जे 'प्रभुशक्ती' (कोश आणि सैन्य) ते क्रमाक्रमाने कसे वाढवले. सैन्य आणि कोश हे एकमेकांस पूरक आहेत हे सुद्धा आपण ह्याआधी पाहिले आहेच. ▶'थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले' या आज्ञापत्रातील ओळीवरुन हे स्पष्ट होते की गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी जिंकण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य आवश्यक होते. थोडक्यात 'राजतंत्र' हे सर्वस्वी सैन्यावर अवलंबून असते. नवीन शत्रुप्रदेश जिंकणे, जिंकलेल्या भागाचे संरक्षण करणे, संरक्षित भागाचे संवर्धन करणे आणि अखेर त्याचे न्यायाने परीचालन करणे ह्या सर्व बाबींसाठी सैन्याची आवशक्यता असतेच. स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात सैन्याची जमवा-जमव हा एक जटील प्रश्न होता. रोहिडेश्वर येथे स्वराज्य शपथ घेणाऱ्या शिवरायांनी पुढच्या काही काळात १ हजार सैन्य उभे केले होते. समोर असलेल्या परिस्थितिमधून मार्ग काढताना, नविन राज्यपद्धती रुद्ध करताना त्यानी एक नविन युद्धतंत्र प्रवर्त...

छत्रपती शिवाजी महाराजांची बलस्थाने

Image
◆ शिवरायांची बलस्थाने "दुर्गम-दुर्ग"- भाग २ ◆ गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे जसे कुठल्याही राजाकडे मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती हे बलाचे ३ प्रकार असणे आवश्यक असते तसेच कुठल्याही राजा आणि राज्याची ४ बलास्थाने असतात.  कोश(खजिना), सैन्य(लश्कर), दुर्ग आणि सुह्रदय(अरिमित्र). ह्यातील प्रभुशक्ती मधल्या एका म्हणजेच 'कोश' या बलस्थानाबद्दल आपण गेल्या भागात थोड़ी माहिती घेतली. प्रभुशक्ती मधल्या 'सैन्य' या दुसऱ्या बलस्थानाचा वापर करून राजांनी कोश-संचय कसा केला हे सुद्धा पाहिले. छत्रपति शिवरायांनी शत्रुच्या मूलखातून गोळा केलेल्या धनामधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम-दुर्ग उभारले. जे बनले 'संपूर्ण राज्याचे सार'. आज आपण छत्रपति शिवरायांच्या 'दुर्गम-दुर्ग' या बलस्थानाबद्दल जाणून घेऊ. राजांनी स्वराज्याचे संपूर्ण S.W.A.T. Analysis (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) केलेले होते असेच म्हणावे लागेल. शिवकाळात 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' हा विचार प्रकर्षाने जाणवतो. परकियांच्या आक्रमणापास...

छत्रपती शिवाजी महाराजांची बलस्थाने

Image