बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )
🚩 बाजींद भाग - ३१ ⚔️ ▶ज्या टकमक टोकाचे नुसते नावच ऐकुन अख्या धनगरवाडीस रात्रीची झोप लागत नव्हती, त्या टकमक टोकाच्या जवळच आपण उभे आहोत ही कल्पनाच सखाराम, नारायण, सर्जा आणि मल्हारीच्या हृदयाला घरकाप उडवणारी होती. वेळ मारन नेत ते चौघेही जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली. मंजुळ घंटानिनाद आणि रुद्राचा घुमणारा आवाज कानी पडताच सखाराम ने जाणले कि श्रीजगदीश्वर मंदिर जवळ आले आहे. मंदिराच्या सभोवताली ताशीव दगडांची पक्की तटबंदी बांधली होती. कमरेला तलवारी, पाठीला ढाल आणि हातात उंचापुरा माला घेतलेले कित्येक धारकरी तिथे पहारा देत होते. जगदीश्वराची नक्षीदार दगडी कमान पार करून ते चौघेही आत प्रवेशले. सकाळच्या गारव्यात आणि रिमझिम पावसात मंदिरातील सुगंधी फुलांचा सुगंध है खरोखर एक रम्य चित्र होते. सरकारी कार्यालयातील अनेक अधिकारी सकाळी सकाळीच दर्शन घेऊन दरबारी जायला गडबड करत होते. सखाराम व चौघे पण जगदीश्वराच्या गाभाऱ्यात गेले. समोर जगदीश्वराचे शिवलिंग शीतल जलधारेत न्हाऊन निघताना दिसत होते. सभोवताली नाना तऱ्हेच्या शोभीवंत फुलांनी यथासांग पूजा केली होती. समोर पुजारी मुखाने पवित्र मंत्र म्हणत येणाऱ्...