Posts

Showing posts from June 16, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १५ जून इ.स.१६६५ (आषाढ शुद्ध त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू,वार गुरुवार) महाराज जड अंतःकरणाने किल्ले राजगडी सुखरुप परत!    तह स्वीकारल्याचे मनोमन इतके दुःख महाराजांना वाटले की, जड अंतःकरणाने महाराजांनी ते स्वतःच स्वीकारले. मात्र ते कोणाजवळ व्यक्त करण्याचे धाडसही महाराजांना नव्हते. रयतेची, सैन्याची, प्रजेची, स्वराज्याची आधिक नासाडी होऊ नये म्हणून हा तह चाणाक्ष बुद्धीने आणि चातुर्याने स्वीकारून महाराजांनी स्वराज्य साफ बुडण्यापासून वाचविले. हा जगप्रसिद्ध तह आणि तहाचा अभ्यास मुळात संपूर्णपणे केल्यास महाराज काय होते याची खात्रीच पटते मात्र त्यानंतर महाराज किल्ले राजगडी परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ जून इ.स.१६७५ महाराजांचा बहादुरखानाचा तह !           किल्ले पुरंदरला बहादुरखानाच्या वकिलांना परत पाठविले असले तरी महाराजांनी बहादुरखानाशी तहाची बोलणी सुरूच ठेवलेली होती असे दिसते. अखेरीस महाराजांनी मोगलांपासून घेतलेला मुलुख, व १७ किल्ले मोगलांना परत करावेत, साल्हेर व मुल्हेर । की सातारा व मावळ? महाराजांकडे रहावेत, दख्खनची सरदेसाईपण...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 १४ जुन इ.स.१६६५ (आषाढ शुद्ध द्वादशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार बुधवार) छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंची छावणी सोडली व कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला.   स्वराज्यावर चालून आलेल्या मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंहानी औरंगाबादला आल्यापासून वेगवान हालचाली करत स्वराज्याची चोही बाजूनी नाकाबंदी सुरू केली.पुरंदर किल्ल्याला वेढा दिला,आणि मोगली सैन्याने स्वराज्यातील मुलखाला उपद्रव देणे सुरू केले. या संकटाची तीव्रता लक्षात येताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंशी तहाची बोलणी सुरू केली. ठरल्यानुसार महाराज मिर्झाराजेंच्या छावणीत तहाचा मसुदा ठरवण्यासाठी दाखल झाले.तह पक्का होऊन त्यानुसार महाराजांनी मुघलांना ४  लाख होनांचा मुलुख ,२३किल्ले देण्याचे ठरले. तहाच्या वाटाघाटी निश्चित झाल्यावर मिर्झाराजेंनी महाराजांना परत जाण्यासाठी निरोप दिला. यावेळी त्यांनी महाराजाना १ हत्ती व २घोडे नजर केले. तहात ठरलेला कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज मुघल सरदार किरतसिंह कछवाह यांच्यासोबत कोंढाण्याकडे निघाले. 🏇🚩🏇🚩🏇...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 १३ जून इ.स.१६६५ पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री शिवाजीराजे आणि मिर्झाराजे यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता. त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या व औपचारिकतेचे बोलणे झाले निरोपाचे विडे दिले गेले, त्यानंतर राजे पुन्हा मिर्झाराजांकडे आले.. दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला त्यानुसार : १. महाराजांकडे लहान-मोठे २३ किल्ले, त्यातील १ लाख होणा (५ लाख रुपये) वसुलासह, शाही कृपेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात येतील. यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये. . २. दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी.. ३. शिवाजीपुत्र संभाजीला मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल. त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.) प्रती-शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेतोजी पालकरास सदैव दख्खच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल.. ४. विजापुरी ...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 १२ जुन इ.स.१६४९ मराठ्यांनी चाकण प्रांत व किल्ले संग्रामदुर्ग स्वराज्यात दाखल करून घेतले. चाकण हा भुईकोट आहे. चाकणची निर्मिती कोणी केली हे अद्यापही ठाऊक नाही. बहामनीच्या राजवटीत चाकण हे सुभ्याचं मुख्य ठिकाण होतं. पुढे चाकणच्या किल्ल्यासाठी अहमद निजाम व बहामनी सरदार आदिलखान (आदिलशाहीचा संस्थापक) यांच्यात लढाई होऊन चाकणचा सुभेदार जैनुद्दीनसह सातशे जण मारले गेले. निजामशाहीचा अस्त होईपर्यंत चाकण निजामाच्याच ताब्यात होते. शहाजीराजांनी सन १६६३ मध्ये निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला त्या वेळी चाकण शहाजीराजांच्या ताब्यात होते.‌‌ स्वराज्य स्थापनेच्या वेळी चाकण आदिलशाहीच्या ताब्यात असून त्यावर आदिलशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हा होता.‌ आदिलशाहीने चाकणचं नाव इस्लामाबाद केले होतं. पुढे शिवाजी महाराजांनी चाकणचा इस्लामाबाद जिंकून घेतला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांचे मन जिंकून घेऊन त्यांना स्वराज्याच्या कामी आणलं, शिवाजी राजांनी चाकणच्या किल्ल्याचं नाव संग्रामदुर्ग ठेवून फिरंगोजी नरसाळा यांनाच किल्लेदारी दिली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १२ जु...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜११ जुन इ.स.१६६५ "छत्रपती शिवाजी महाराज" आणि "मिर्झाराजे जयसिंग" यांच्यात प्रसिद्ध "पुरंदरचा तह" इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. शिवाजीमहाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन इ.स.१६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे इ.स.१६५७ गु...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜१० जून इ.स.१६४० #हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या ३८१ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा जन्म जावळीच्या खोऱ्यातील गणी गावात झाला. चार छत्रपतींच्या सोबत इमानाने राहिलेलं मोजक्या घराण्यातील एक गोळे घराणे, ह्याच गोळे घराण्यातील इतिहासात एकनिष्ठ म्हणून उल्लेख आढळतो. पिरंगुट या गावी त्यांची पवित्र समाधी आहे व जगदीश्वराचे मंदिर पण आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० जुन इ.स.१६५८ औरंगजेबाचा पहिला दरबार आग्रा येथे भरला. आता औरंगजेब आग्रा येथे शिरला. थोड्याच दिवसांत शहाजहान कैद झाला आणि औरंगजेबाचा पहिला दरबार १० जुन इ.स.१६५८ रोजी आग्रा येथे भरला. औरंगजेबाने पहिले सिंहासनारोहण केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० जुन इ.स.१६६१ (ज्येष्ठ वद्य अष्टमी, शके १५८३, संवत्सर प्लव, वार सोमवार) कल्याण-भिवंडी महाराजांच्या ताब्यात!    महाराजांनी कल्याण-भिवंडी मोहीम करून या भागावर आधिपत्य प्रस्थापित केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० जुन इ.स.१६६४ अजीजखान वेंगुर्ला येथे मृत्यू पावला. अजीजखान आल्याचे कळत...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 ९ जून इ.स.१६५९ ९ जून १६५९ रोजी औरंगजेबाने दारा शिकोह याला कैद केले. कैदी दाराला पकडल्या गेल्यानंतर पूर्ण कल्पना होती की आपण मारले जाणार आहोत. दाराला देहांताची शिक्षा देण्यापूर्वी औरंगजेबाने त्यास निरोप पाठवून असे विचारले की, "दैव आज तुला जितके प्रतिकूल झाले आहे , तितकेच अनुकूल झाले असते. आणि मला (औरंगजेबाला) तू कैद केले असतेस तर तू काय केले असते..? यावर दाराने राजपुत्र या दृष्टीने आपल्या व्यक्तित्वास साजेसे उत्तर दिले.. "अशी परिस्थिती आली असती तर (मी) तुझ्या शरीराचे चार तुकडे करून दिल्लीच्या चार दरवाजांच्या पुढे उघडे फेकून देण्यास सांगितले असते" हे उत्तर कळविल्यानंतर औरंगजेबाने दारास देहांताची शिक्षा फर्मावली. #थोडे_अपरिचित_उद्गार.. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ जुन इ.स.१६६१ महाराजांचा महाड येथे मुक्काम !   महाराजांनी कुडाळकर सावंतांकडे दुर्लक्ष केले. व ते किल्ले राजगडाकडे जाण्यासाठी पुढे निघाले. महाराज महाडला पोहोचले. महाड येथे मुक्काम सुमारे २ दिवस होता. राजापुरचे सुभेदार रावजी पंडितही महाराजांच्या...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ८ जुन इ.स.१६६६ (वद्य द्वितीया, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार) रामसिंगने महाराजांच्या रक्षणार्थ जास्त काळजीपूर्वक पहाऱ्याच्या सुचना दिल्या. महाराजांचे रक्षण करण्याचा विडाच रामसिंगाने उचललेला दिसतो. शिवाय मिर्झाराजे जयसिंग यांनी दिलेल्या महाराजांच्या जिविताच्या हमीने महाराजांचे रक्षण प्राणपणाने करण्याच्या सूचना रामसिंहाने आपल्या विश्वासू माणसांना पुन्हा एकदा दिल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ जुन इ.स.१६६८ पेडण्याचे सुभेदार विरो पंडीत यांस व्हिसेरेईने पाठविलेल्या पत्राची नोंद! "उपद्व्यापी देसायांना आमच्या राज्यातून हाकलून देण्यात आले आहे. व्हिसेरेईने महाराजांनाही ही गोष्ट कळविल्याचा पुरावा उपलब्ध आहे. गोव्याच्या व्हिसेरेईने बंडखोर देसायांना गोवा राज्यातून हाकलून लावले ते अर्थात कुडाळ मध्ये परत गेले. परंतु महाराजांनी त्यांना पकडून शासन न करता औदार्याने वाढविले. त्यानंतर त्यांनी ज्याअर्थी बंडाळी माजविल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यावरून ते महाराजांचे प्रजाजन म्हणून कुडाळ मध्ये राहीले असले पाहिजेत. महाराजांचा व पोर्तुगिजा...