ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 ६ मार्च इ.स.१६६० ४ मार्च च्या दिवशी सिद्दी जौहरने पन्हाळा वेढला (वेढा घातला).आणि शिवाजी महाराज वेढ्याच्या पेचात सापडले शिव छत्रपतींना प्रतापराव गुजर यांची प्रतीक्षा..!! इंग्रज अधिकार्यांकडून सिद्दि ला तोफा आणि दारू गोळ्यांची रसद पुरवतो म्हणून होकार...!! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 ६ मार्च इ.स.१६६५ (फाल्गुन अमावस्या, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार सोमवार) महाराज व मिर्झाराजे जयसिंग दिल्लीकडे निघाले. मिर्झाराजे जयसिंग ३ मार्च रोजी पुण्यात आले. यावेळी महाराज जसवंतसिंह बादशाही फौजेसह तिथे तळ ठोकून बसला होता. याच सुमारास महाराज व मिर्झाराजे जयसिंग जसवंतसिंहाची भेट झाली आणि पुढील मोहीमेची सगळी सूत्रे मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडे सुपूर्द करून महाराज जसवंतसिंह दिल्लीकडे निघून गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 ६ मार्च इ.स.१६६६ (फाल्गुन शुद्ध दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार मंगळवार) औरंगजेबाचे अभयपत्र! महाराजांना जिविताची हमी देणारे अभयपत्र मिळाले. महाराजांनी बिनघोर आग्रा येथे यावे हा औरंग्याचा डाव मात्र केवळ स्वराज्याखात...