ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ११ मे इ.स.१६६६ आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज ११ मे रोजी 'मालुकचंद सराय' येथे येऊन पोहचले. येथुन आग्रा शहर खुपच जवळ होते. छत्रपती शिवरायांच्या भेटीला रामसिंगचा मुन्शी गिरधारीलाल नजराणा घेऊन हजर. मुन्शी गिरधारीलाल याच्यामार्फत छत्रपती शिवरायांनी इनामवर्दीखानाकडून ८ हत्ती भाडे तत्वावर घेतले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ११ मे इ.स.१६७८ महाराज किल्ले रायगडी परतले. महाराजांनी किल्ले प्रतापगडावर श्रीभवानीच्या दर्शनार्थ आले. श्रीभवानीची पुजा बांधून महाराज किल्ले रायगडी परतले. सुमारे १६ ते १७ महिने किल्ले रायगडापासून तसेच स्वराज्यापासून ते दूर होते.. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ११ मे १६८१ बादशहाच्या फौजा पाठीवर असल्यामुळे छत्रपती संभाजीराजांना पाठवलेल्या पत्राची वाट न पाहता 'शहजादा अकबर' तसाच खानदेश बागलानातून महाराष्ट्रात आला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ११ मे १६८६ छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातील लहान तारवास समुद्रात फिरण्याची प्रत्येकी चार आण्यापेक्षा जास्त पैसा न देता दस्तक द्यावा...