Posts

Showing posts from April 14, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 १४ एप्रिल इ.स.१६६४ जसवंत सिंह राठोड याने सिंहगडावर सुलतालढवा केला. हा एकमेळाने केलेला हल्ला मराठ्यांनी उधळून लावला. जसवंत सिंहाची पाठ मराठी चित्त्यांनी फोडून काढली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ एप्रिल इ.स.१६६५ इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखान, फतेलष्कर, अब्दुल्ला व महेली या मोगलांनी ३ तोफांच्या सहाय्याने वज्रगड/वज्रमाळ जिंकला. वज्रगड किल्ला पुरंदर किल्ल्याशेजारीच त्याचा धाकटा भाऊ होऊन उभा आहे. ३१ मार्च रोजी पुरंदरचा वेढा सुरु झाला होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ एप्रिल इ.स.१६६५ “इ.स. १६६५ एप्रिल १४. कॉन्सल लॅनॉय आलेपो-अर्ल ऑफ विंचिलझिया" सुरतेच्या प्रेसिडेंटचे पत्र आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरत सुरक्षित आहे. परंतू मोगलांच्या मुलुखांत ते स्वैर संचार करुन कित्येक शहरे लुटीत आहेत. बादशहाचे बडें सैन्य त्यांच्यावर आले आसतांहि वाटेंत शत्रुविरुद्ध नाकेबंदी करीत करीत ते थेट गोव्या पर्यंत किनार्‍याने जाऊन आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १४ एप्रिल इ.स.१६७३ छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून रायगडावर आले. 🏇🚩🏇🚩🏇...