बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )
🚩 बाजींद भाग - ३० ⚔️ ▶वस्ताद काकांचा शब्द निशाण धरलेल्या शिलेदाराला ऐकू जाताच त्याने ठासणीची बंदूक खाली करत खाली आवाज दिला….” ए खोल रं दिंडी दरवाजा….परवली चा शबुद बरोबर हाय…” रायगड च्या चित दरवाज्याचा दिंडी दरवाजा उघडला गेला आणि एक मावळा बाहेर येत म्हणाला…”रामराम शिलेदार…..काय बेत गडावर येण्याचा…? त्याच्याकडे हसत वस्ताद काका बोलले…बहिर्जी नाईकांची खास माणसे आहेत ही…परवली चा शब्द उंबर फुल हाय…” उंबर फुल…बर बर मग तुमास्नी कोण आडीवणार…..या या आत या…असे म्हणत तो मावळा आत गेला पाठोपाठ वस्ताद काका व सखाराम सह त्याचे साथीदार आत गेले….! आत प्रवेशाताच मावळयाने दिंडी दरवाजा आतून बंद करुन घेतला. आत निमुळती होत गेलेल्या दिवडीत धिप्पाड भालाईत उभे होते. तोफांची तोंडे चिखलाने लिपुन बंद केली होती. बाजूला पाच पन्नास पहारेकरी हशम तलवारी कमरेला अडकवून कामात गुंग होते…! शिवशाही ची शिस्त पाहण्यासारखी होती. कोणीही बेशिस्त नव्हते..! समोरच एका धिप्पाड धारकऱ्याने वस्ताद काका ला ओळखले व लगबगीने धावत तो जवळ आला आणि मुजरा करत बोलला….मुजरा वस्ताद काका…! लई दिसान गडावर येन केलासा ..! बरं वाटलं तुमचं ...