ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ५ मे इ.स.१६५७ (ज्येष्ठ शुद्ध द्वितीया, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार मंगळवार) महाराजांची किर्ती सातासमुद्रापार! पोर्तुगालच्या राजास लिहीलेले एक सुंदर पत्र उपलब्ध असून, त्यात त्याने लिहिले आहे की, "राजे शहाजीराजे यांचे बंडखोरपुत्र, " शिवाजीराजे यांनी उत्तरेकडील मुलखास उपद्रव दिला आहे. त्यामुळे आधिकचे ८० शिपाई चौल येथे बंदोबस्तासाठी पाठवावे लागत आहेत". सिंधुसागराच्या पाठीवर लाटांची टिपरी वाजवून सातासमुद्रापलीकडील पोर्तुगालच्या राजास गोव्याच्या गव्हर्नरने शिवाजी महाराजांची महती ऐकवली आहे. पाश्चात्य श्रीशिवचरीत्र संदर्भातील हा बहुधा पहीलाच उल्लेख असावा. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ५ मे इ.स.१६६३ गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला छत्रपती शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले. १६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गाडी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी ...