ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २२ फेब्रुवारी इ.स.१६६५ छत्रपती शिवरायांनी कर्नाटकातील "कारवार" जिंकले. छत्रपती शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात छत्रपती शिवरायांच्या समोर रूजू केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २२ फेब्रुवारी इ.स.१६८४ केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून छत्रपती संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्या पलतात ( Paltata पलते ) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन छत्रपती संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिर...