ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २२ मे इ.स.१६३२ मुलुख मैदान तोफ विजापूरला नेहली... बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर परंडा हा अहमदनगरच्या निजामाकडे आला. तेव्हा इ.स. १६२८ ते १६३० च्या दरम्यान शहाजीराजांनी मुर्तुजा निजामाला गादीवर बसवून येथूनच कारभार चालविला. त्यामुळे जिजाबार्इंच्या रूपाने छत्रपतींचे वास्तव्य परंड्यात राहिले होते. अहमदनगरच्या निजामशाहीच्या काळातच येथील २६ बुरुजांवर विविध तोफा ठेवण्यात आल्या. यापैकी मलिक- इ-मैदान, कसाब, खडक अझदहपैकर या महत्त्वाच्या तोफा असून आज भारतातील नावाजलेली विजापूरच्या सर्जा बुरुजावरील मुलुखमैदान (मलिक-इ-मैदान) तोफ १६३२ पर्यंत परंड्याच्या बुरुजावर होती. साधारणपणे २२ मे १६३२ ला विजापूरच्या आदिलशहाचा दिवाण मुरार जगदेवने १० हत्ती आणि ४०० बैलांच्या साह्याने ५५ टन वजनाची ही तोफ विजापूरला नेली. त्यापूर्वी नगरचा दिवाण मलिक अंबरने सोलापूरवर तिचा वापर केला होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २२ मे इ.स.१६७३ इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) टॉमस निकल्स याने युवराज शंभुराजेंना भेटण्याची परवानगी मिळाली. महाराज गडावर नसल्यामुळे टॉमस निकल्सने युवराज शंभुराजेंना भेटण...