बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )
🚩 बाजींद भाग - ६ ⚔️ ▶ राजे येसाजीरावांच्या मस्तकात फुटाणे उडत होते. साऱ्या महाराष्ट्रातील मनसबदारांच्या पुढ्यात नाचक्की झाली होती. काय कमी केलं होत “भीमा” च्या कुस्ती-मेहनत-खुराकात ? रोज सकाळी पाच रात्री पाच शेर दूध. दररोजचा ६-६ तास व्यायाम. तगड्या मल्लांसोबत लढती.मालीश, मसाज करायला नोकर चाकर…मेहनत मोजून घ्यायला मुनीम.. सगळं राजेशाही असून शिळमकर देशमुखांच्या मल्लाला ऐकला नाही…! डोकं भनभनत होत. तेवढ्यात एका हुजऱ्यान वर्दी दिली…”राजे,ते मैदानातले पैलवान आणि वस्ताद आल्यात भेटाया” राजे सावरुन बसले,भोवताली दिगग्ज सल्लागारांचे पथक दिमतीस होतेच…..”बोलवा,त्यांना” राजांनी आदेश दिला….! काही क्षण भूतकाळात विलीन झाले आणि चारचौकी शिर्के वाड्यातील सदरेत पैलवान खंडेराय आणि त्याचे वस्ताद आले…! ▶ खंडेराय….अगदी वीस-पंचवीशीतला उमदा जवान गडी.ओठावर नुकतीच काळी रेघ दिसत होता.अंगापिंडाने धिप्पाड खण्डेराय पाहून कोणीही त्याच्या प्रेमात न पडावे तर नवल. डोईला मराठेशाही पगडी,कमरेला तलवार असलेल्या खंडेराय व त्याच्या वस्तादांनी राजाना मुजरा केला. उजवा हात वर करत राजांनी पण मुजरा स्वीकारला आणी बोलू ला...