बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )
🚩 बाजींद भाग - ४८ ⚔️ ▶साऊ…ज्यांच्यामुळे हा खंडोजी घडला, हे माझे वस्ताद काका…! सावित्री पुढे आली आणि तिने वस्ताद काकांचा आशीर्वाद घेतला…! राजे येसाजीराव बोलले……वस्ताद काका…आता आम्हीही तुमच्या खांद्याला खांदा लावू लढणार स्वराज्यासाठी…! सखाराम हे सारे भरल्या डोळ्यांनी पाहत होता…काय ही वेडी माणसे आहेत. वयाचा उत्तरार्ध सुरु आहे, मरण केव्हाही यांना गाठेल असे वय जगत आहेत, मात्र भाषा करत आहेत स्वराज्यासाठी लढायची….. खरोखर ही हिंदवी स्वराज्याची मांदियाळी आमच्या नशिबी का नाही… किती दिवस आम्ही संसाराच्या गाडग्या मडकक््यासाठी जगायचे…सखाराम चे अश्रू अनावर होत होते…! ▶दरम्यान जंगलातील पूर्वे बाजूकडून शिंगे तुतारी कर्णे गर्जू लागली…! 👉सर्वांनी ताडले……शिवरायांचे पथक आले. सारे गडबडीने तिकडे जायला निघाले. जंगलातील त्या पठारी भागात, एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज मानाने डोलत होता. मागोमाग पाचशे-सहाशे हत्यारबंद धारकरी दोडत येत होते. आणि एका काळ्या घोड्यावर खुद्द राजश्री छत्रपती शिवाजीराजे बसले होते. डोक्यावरील मंदीलाला मोत्याचे घोस लावून रोवलेला तुरा हिन्काळत राज...