ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️ १३ जानेवारी इ.स.१६८० संभाजीराजे व शिवाजी महाराज यांची पन्हाळा या गडावर ऐतिहासिक भेट. युवराज संभाजीराजांनी मोगल छावणीतून पळ काढला व ते पन्हाळगडावर वडिलांस भेटावयास डिसेंबर १६७९ त परत आले. तेथे पितापुत्रांची भेट दिनांक १३ जानेवारी १६८० रोजी झाली. महाराजांची एक मोठी काळजी दूर झाली. भेट झाल्यावर संभाजीराजांनी महाराजांच्या पायावर डोके ठेविले. महाराजांनी संभाजी राजांस जवळ बसण्याचा आग्रह केला. संस्कृतपटू संभाजीराजे विनयाने वडिलांपाशी बसले. महाराज संभाजीराजांस म्हणाले, “लेकरा, मला सोडू नको. औरंगजेबाचा व आपला दावा. तुजला दगा करावयाचा होता. परंतु, श्रींने कृपा करून सोडून आणिला. थोर कार्य जाले. आता तू ज्येष्ठ पुत्र, थोर जालास आणि स्वतंत्र राज्य कर्तव्य हे तुझ्या चित्ती आहे असे आपणांस कळले. तर मजला हे अगत्य आहे. तरी तुजलाही राज्य एक देतो. आपले पुत्र दोघेजण एक तू संभाजी दुसरा राजाराम-ऐसियास- हे सर्व राज्य आहे. यास दोन विभाग करतो. एक चंदीचे राज्य, याची हद्द तुंगभद्रा तहद् कावेरी हे एक राज्य आहे. दुसरे राज्य तुंगभद्रा अलीकडे गोदावरी नदीपर्यंत राज्य आहे. ...