बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )
🚩 बाजींद भाग - ४३ ⚔️ ▶साराह बोलत होती आणि बाजीराव ऐकत होता. बाजीराव साराह चा निरोप घेऊन विमानतळावर आला. प्रवासात डोक्यात फक्त आणि फक्त एकच विचार घुमत होता…बहिर्जी. किती मूर्ख आहोत आपण आणि आपले लोक. साऱ्या जगाला घाबरून सोडणारी मोसाद ही मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास अभ्यासून मार्ग ठरवते आणि आम्ही रक्ताचे मराठे आज तुटपुंज्या देशाचा दहशदवाद गेली ५० वर्षे सहन करतो आणि सतत अपयशी ठरतो…त्याच्या डोक्यात आग लागली होती. तो दिल्लीत आला. परिषदेतील सर्व बाबी त्यांनी अधिकार्यांना सांगून ३ महिन्यांची रजा मागून घेतली. दिल्लीत बऱ्याच ग्रंथालयात त्याने बहिर्जी नाईक यांच्याबद्दल माहिती मिळते का पहिल्री, पण जेमतेम माहितीशिवाय काही हाती लागले नाही. ३ महिन्यांच्या सुट्टीवर तो त्याच्या जन्मगावी पलूस येथे आला. घरी आल्यानंतर त्याला आतुरता होती…….बहिर्जी नाईकांच्या समाधी दर्शनाची. ▶घरी आल्यानंतर त्याला आतुरता होती…….बहिर्जी नाईकांच्या समाधी दर्शनाची. बानूरगड …. जे पल्रूस पासून वीस-बावीस किलोमीटर वर आहे तो प्राचीन किल्ला. त्याने सकाळीच बुलेट ला किक मारली आणि थेट बाणूरगड गाठला. वासरू जसे गाईसाठी क...