Posts

Showing posts from April 4, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ४ एप्रिल इ.स.१६२३ पेट्रोडीला व्हेल पोर्तुगीज लिहितो कि, ‘मी चौल बंदरातून निघून दंडराजपुरी बंदराच्या जवळून गेलो हे एवढेच बंदर निजामशहाच्या ताब्यात आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ४ एप्रिल इ.स.१६६३ (चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५८५, संवत्सर शोभन, वार शनिवार) महाराजांची शाहिस्तेखानाला शास्त देण्याची तयारी! महाराजांची महाराजांचा मुक्काम यावेळी किल्ले रायगडावर होता. तेथून ते किल्ले राजगडला परतले. सरनौबत नेतोजी राजगडी दाखल झालेले होतेच. मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार किल्ले सिंहगडावर गेलेले होते. राजगडी पोहोचताच महाराजांनी निवडक मुत्सद्यांसमवेत विचार विनिमय करून प्रत्यक्ष शाहिस्तेखानावरच हल्ला करण्याचा आपला धाडशी बेत त्यांना सांगितला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ एप्रिल इ.स.१६७० नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता. नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते पळून गेले....