ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ६ मे इ.स.१४५२ सेंट झेविअर गोव्यात आला! व त्याने इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. येशू ख्रिस्ताच्या निर्वाणानंतर त्यांच्या काही शिष्यांनी युरोपात स्थलांतर केले व युरोप मध्ये आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न चालू केला. 'ज्यू लोकांना बाटविण्यासाठी त्यांचा छळ करणे इ. गोष्टी इटली, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल ह्या देशांमध्ये सुरू झाल्या. पुढे या गोष्टी पोर्तुगालमधून हिंदुस्थान व गोव्यात आल्या. हे करताना ज्यू लोक जे नवख्रिश्चन झाले ते त्या धर्माचे आचरण व्यवस्थित करतात की नाही. याचा शोध घेण्यासाठी ते न करणारांस शिक्षा देण्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरू ९ वा ग्रेगरी पोप याने इ.स.१२३९ मध्ये इक्विझिशन (पवित्र न्यायसभा) स्थापन केले आणि त्यांच्या द्वारे लोकांचा अनन्वित छळ सुरू झाला. त्यातील काही नवख्रिश्चन ज्यू गोव्यात आले. गोव्यातही बाटवाबाटवीने नवख्रिश्चन झाले होते. त्या नवख्रिश्चनांना शिकविण्यासाठी सेंट झेविअर गोव्यात आला, ती तारीख होती, ६ मे इ.स.१४५२. आणि त्याने गोव्यात इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. "पेतरोज" हा इतिहासकार म्हणतो....