Posts

Showing posts from April 16, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 १६ एप्रिल इ.स.१६४० (वैशाख शुद्ध पंचमीस, शके १५६२, विक्रमनाम संवत्सर, वार गुरुवार) महाराजांचा निंबाळकर घराण्यातील सईबाईसाहेब यांच्याबरोबर विवाह ! राजे शहाजीराजे यावेळी कर्णाटकात मोहिमेत गुंतले होते. बहुधा राजे शहाजीराजे यांच्या संमतीने पण राजे शहाजीराजे यांच्या अनुपस्थितीत महाराजांचा विवाह निंबाळकर पवारांच्या मुलीशी म्हणजेच मुधोजी निंबाळकर यांची कनिष्ठ कन्या, व बजाजी निंबाळकर यांची कनिष्ठ भगिनी ,राजसबाईसाहेब उर्फ सईबाईसाहेब यांच्याशी विवाह झाला. हा विवाह विजापुरास झाला. त्यावेळी लग्नांत महंमद आदिलशहा ह्याने येऊन वधुवरांचा सन्मान केला. फलटणचे निंबाळकर घराणे, भोसले व जाधव घराण्यांतील पुर्वजात सोयीरसंबंधांची साक्ष देते की १, लखुजीराजे जाधवराव यांची पत्नी माँसाहेब जिजाऊसाहेबांची आई-गिरीजिबाईसाहेब उर्फ म्हालसाबाईसाहेब ह्या फलटणच्या अनंगपाळ निंबाळकर यांच्या भगिनी होत्या. २, अनंगपाळ निंबाळकर यांची मुलगी-मुधोजीराजे निंबाळकर यांच्या भगिनी दीपाबाईसाहेब उर्फ, उमाबाईसाहेब ह्या राजे मालोजीराजे भोसले ह्यांच्या पत्नी व राजे शहाजीराजे ह्यांच्या मातोश्री हो...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १८३ ⚔️ ▶पादशाहपूरहून रात्रीच कूच करून कल्याणजवळच्या मढगडढीमार्गे राजे गांगोलीला आले. त्यांच्याबरोबर दोन हजार घोडालोक आणि दोनशे पावलोक होता. त्यांच्या राहुट्या गांगोलीत पडल्या. पुत्रप्रासी झाली त्या वेळी राजे येसूबाईना भेटण्यासाठी मागे आले होते गांगोलीत. संगती आलेल्या प्रल्हादपंतांशी राजांची पुढच्या हालचालींची, वाड्याच्या सदरेवर बातचीत चालली होती. “न्यायाधीश, बहिर्जींना कलम द्या. गाठीचे निवडक खबरगीर फिरंग्यांच्या चौल-तारापूर भागात पेरण्यास लिहा. मिळेल ती खबर उचलून टाकोटाक आम्हास पावती करायला कळवा.”📜 👉“जा. एक संतोषाची खबर आली आहे. बीड भागात आपल्या फौजेनं आदिलशाहीचा किल्ले धारूर कब्ज केला आहे.” प्रल्हादपंत म्हणाले. 👉“किल्ले धारूर! याच किल्ल्यावर मिर्झा राजेने नेताजी पालकरकाकांस कैद करून ठेवले होते. आम्ही आबासाहेबांसह आग्ऱ्यातून सहीसलामत सुटलो, त्याने संतापून गेलेल्या औरंगने कैदी काकांना किल्ल्याबाहेर काढून, जखडबंद करून, उंटाच्या पाठीवर लादून पाठवावे, असा मिर्झा राजास हुकूम केला आणि चांदणीचौकात पोहोचताच त्यांची भरचौकात सुन्नत केली....