ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २४ एप्रिल इ.स.१६२८ शाहजहानने खानजहानच्या जागी दक्षिणेचा सुभेदार म्हणून महातबखानाची नेमणूक केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ एप्रिल इ.स.१६७४ (चैत्र वद्य चतुर्दशी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार शुक्रवार) छत्रपती शिवाजी महाराजांनी केंजळगड स्वतः छापा घालून काबीज केला. वास्तविक पाहता दोन महिन्यांनी त्यांचा राज्याभिषेक होणार होता. त्यांनी स्वतः या छाप्यात सहभागी होणे टाळता आले नसते का ? पण त्यांनी तसे केले नाही व जिजाऊ साहेबांनीही त्याला विरोध केला नाही. स्वतः महाराजांनी या हल्ल्याचे यशस्वी नेतृत्व केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४, एप्रिल इ. स. १६८३, (वैशाख शुद्ध अष्टमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार मंगळवार) सुरतकर इंग्रजांनी लंडनला लिहीलेल्या पत्राची नोंद! या पत्रातून औरंगजेब बादशहाने भिवंडीची सेना काढून घेतली असा उल्लेख सापडतो. अशा तऱ्हेने कल्याण-भिवंडीच्या मोहीमेत छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहास मराठी बाण्याचे दर्शन घडविले आणि ही मोहीम चुरगाळून टाकली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ एप्रिल इ.स.१७०० छत्रपती राजाराम महाराज...