ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶📜 १२ मार्च इ.स.१६६४ सुरतकरांनी कंपनीस एक पत्र पाठविले ते असे : "...शिवाजीची सत्ता व सामर्थ्य वाढत असून सर्वांना त्याचे भय वाटते... आज त्याच्या ताब्यात काही नाही तरी आठ नऊ महत्त्वाची बंदरे आली आहेत. या प्रत्येक बंदरातून इराण, बसरा, मक्का या बाजूला त्याची निदान दोन तीन गलबते व्यापारानिमित्त बाहेर पडतात...." या व्यापारार्थ बाहेर पडणाय्रा महाराजांच्या गलबतांना पकडून इंग्रजांना आपल्या वखारीच्या लूटीची भरपाई करुन घ्यायची होती त्यासाठी टपून बसले होते. शिवरायांनी आता मोठ्या आरमारी स्वारीचा बेत आखला होता. त्याचे नेतृत्व ते स्वतः करणार होते त्यानुसार फेब्रुवारी १६६५ रोजी शिवराय मालवण येथील सिंधुदूर्गाहून ८५ लहान गलबते व ३ मोठी गलबते घेऊन बार्सिलोर ( बसनूर ) वर निघाले त्यांच्या बरोबर ४००० सैन्य होते. बसनूर हे शहर शिवरायांनी लुटले. या स्वारीचे वर्णन सभासद बखरकार करतो - " शहरांचे लोक बेहुशार होते. एकाएकी जहाजांतून मराठे उतरले, शहर मारिले एक दिवस शहर लुटून फन्ना केले. जैशी सुरत मारुन मालमत्ता आणली त्याप्रमाणे बसनूरची मालमत्ता, अगणित माल,...