बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )
🚩 बाजींद भाग - ४६ ⚔️ ▶खंडोजी हसला आणि बोलू लागला. काका…..ही सारी कहाणी घडवली गेली ती बहिर्जी नाईकांनी…..! मोठा श्वास घेऊन खंडेराय त्याचा भूतकाळ सांगू लागला. त्या दिवशी तुम्ही मला यशवंतमाचीत भेटायला आलात आणि बहिर्जी नाईक माझ्यावर नाराज आहेत असे सांगून मला त्वरित त्यांची भेट घ्यायला सांगून निघून गेलात…तोवर जे घडले ते माझ्या बुद्धीने घडले. पण, बार्जिंद ची गूढ ज्ञानाची वही घेऊन मी नाईकांच्या गुप्त ठिकाणी असलेल्या एका गुहेत सुरक्षित ठेवायला गेलो आणि वही ठेवून मी परत यशवंतमाचीत जाणार इतक्यात त्या गुहेत खुद्द नाईक मला भेटले. जो वृत्तात मी तुम्हाला सांगितला, तोच वृत्तांत मी नाईकांना सांगितला. बराच विचार करून नाईकांनी मला नियोजन बदलण्यास सांगितले. आणि त्यानुसार मी चालू लागलो. मराठ्यांची चिवट फोज जिंकणे साक्षात यमालाही अजिंक्य आहे, मात्र मी भीमाचा वापर करून तुमचा हल्ला परतवल्रा. भीमाने यशवंतमाचीच्या गुप्त खबरा बाहेर देणे सुरु केले होते, आणि त्यायोगे सावित्रीसोबत लग्नाची स्वप्ने रंगवणे सुरु केले होते हे मना आधीच समजले होते, म्हणून त्याला संपवणे हे गरजेचे होते. ▶दरम्यान, बाजिंद चे ते...