Posts

Showing posts from March 24, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २३ मार्च इ.स.१६६० (चैत्र वद्य सप्तमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, वार शुक्रवार) संकटाची मालिका! स्वराज्याचा फास आवळत चालला होता. त्यात भर म्हणून अदिलशहाने मावळच्या सर्व देशमुख, वतनदारांना केदारजी खोपड्याच्या मदतीने कौलनामे पाठवून आदिलशाहीस मदत करण्यासाठी विनंती पत्रे लिहीली. एकीकडून अदिलशाहीने सिद्दी जौहरच्या रुपाने तर दुसरीकडे मोगलांकडून शाहिस्तेखानाच्या रुपाने फास आवळत चालला होता. त्यातच वतनाच्या लोभाने आपलेच लोक फुटून संकटात महाराजांना साथ देण्याऐवजी यवनांना जाऊन मिळत होते, त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २३ मार्च इ.स.१६७४ नेसरी येथे झालेल्या बहलोलखान आणि प्रतापराव गुजर यांच्यात झालेल्या लढाईत ( २४ फेब्रुवारी १६७४ ) प्रतापराव गुजर मृत्यूमुखी पडल्यानंतर मराठा सैन्यानी आनंदराव मकाजी यांच्या नेतृत्वाखाली कानडी मुलुख झोडपायला सुरुवात केली. तेंव्हा बहलोलखान आंनदराव मकाजी यांच्यावर चालून आला पण त्यांनी खानाचा पराभव केला. त्यांनतर दिलेरखान व बहलोलखान आनंदराव मकाजी यांच्यावरती संयुक्तपणे चालून गेले. पण...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १६६ ⚔️ ▶तो क्षण ऐन तोंडावर आला ज्याची अटकळ कैलासवासी स्वामींनी केव्हाच बांधली होती. आता सर्वांसमोर एकच होते. अटीतटीचा जंग-झगडा. पंचवीस वर्षानंतर दख्खनेकडे वळलेल्या एका पाताळयंत्री, पाशवी शत्रूबरोबर. जबर महत्त्वाकांक्षा आपल्या तसबीहच्या माळेत गुंफून अलमगिराने दक्षिणेचा मोहरा ठेवला होता. कन्याकुमारीपासून काबूलपर्यंत सल्तनतीचे जाळे फेकण्याची महत्त्वाकांक्षा! जिच्या हातात होते शस्त्र, मांडेखाली घोडे, उंट, हत्ती आणि मनात निवडीचे कपट, क्रौर्य! जिची ढाल होती धर्म, मागे होती सार्वभौमत्वाची हवस. जिचा प्यारा रंग होता हिरवा. निशाणी होती चांद-तारा आणि नारा होता, “दीन, दीन.' 👉या येत्या संकटाला तोंड देण्यासाठी द्षिणियांची फळी बांधण्याचे आवाहन करणारे खलिते विश्वासू हारकऱ्यां मार्फत कुतुबशाही आणि आदिलशाही दरबाराला धाडण्यात आले. पन्हाळ्यास बांधाबांध करून गड सोडावा, या विचारात असलेल्या महाराजांच्या कानांवर अश्विन वद्य द्रादशीला मन थिजवून टाकणारी दुसरी वार्ता येऊन आदळली. 👉 येसूबाईना पाठविलेल्या जोत्याजीने पन्हाळगड चढून खालच्या मानेने महाराजांन...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २४ मार्च इ.स.१३०७ देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ मार्च इ.स.१६६२ (चैत्र पौर्णिमा, वद्य प्रतिपदा, द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभकृत, वार सोमवार) मोगल मराठा संघर्ष! २६ मार्च इ.स.१६६२ मोगल मराठा संघर्षाचा विक्रम जागोजागी शाहिस्तेखानाला शह देण्यासाठी मराठ्यांचा एल्गार सुरू होता. मराठी मनगट काय असते याची शाहिस्तेखानाला मजबूत प्रचिती आली होती. याच सुमारास पेणवर छापा घालून नामदार खानाला करारा झटका याच जबरदस्त लढाईत वाघोजी तुपे जखमी तर कृष्णाजी बाबाजी धारातिर्थी पडले. मात्र मराठी राज्यात सह्याद्रीच्या डोंगररांगात आता आपण जास्त तग धरू शकत नसल्याची मोगली सेनेला जाणिव झाली. मात्र इतके पराभव, लुटपात होऊनसुद्धा औरंगजेबाकडे मात्र खोटीनाटी पत्रे पाठवून १शाइस्तेखान विजयाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराभवाच्या खोट्या गोष्टी करत लालमहालात ऐशोआरामात लोळत होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ मार्च इ.स.१६७४ मुंबई बेट इंग्रजांच्या ताब्यात इ. स. १६६४ डिसेंबरमध्ये आले. त्या ...