Posts

Showing posts from April 23, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २३ एप्रिल इ.स.१६५७ (वैशाख वद्य षष्ठी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार) महाराजांचे नगरचा मोगली सुभेदार मुल्तफखानास पत्र ! "आपली मागणी मंजूर होत असल्यास आपण शाही फौजेत दाखल व्हायला तयार आहोत". अशा आशयाचे पत्र लिहिले मुल्तफखानाकडून महाराजांना अनुकूल उत्तर प्राप्त झाले. या उत्तराच्या बळावर महाराजांनी प्रत्यक्ष औरंगजेब बादशहाकडे आपले वकील म्हणून सोनोपंत यांना रवाना केले. सोनोपंतांनी महाराजांची मागणी औरंगजेब बादशहा समोर ठेवली. महाराजांचे म्हणणे असे होते की, "विजापुरकडील जो मुलूख व किल्ले माझ्याकडे आहेत ते मलाच मिळावेत व नुकताच उत्तर कोकणचा दाभोळ बंदरावरील जो भाग मी जिंकून घेतला आहे त्यालाही औरंगजेब बादशहाने मान्यता द्यावी". हा सर्व मुलूख आदिलशहाचाच असल्यामुळे तो महाराजांना बहाल करण्यात औरंगजेब बादशहाचे काहीच बिघडत नव्हते.निव्वळ मान्यतादर्शक शब्दांचाच खेळ खेळायचा होता. हे औरंगजेब बादशहाने आनंदाने केले! औरंगजेब बादशहाच्या मान्यतादर्शक पत्राचे "मोल" महाराजही जाणत होते.आपल्या मनाचा थांगपत्ता लागू न दे...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १९० ⚔️ ▶पेशवे निळोपंत चिंताक्रांत चर्येने खाशांच्या भेटीस आले. बराच वेळ ते काही बोलेनात. 🔊“जे असेल ते बोला निळोपंत. काहीसुद्धा ऐकण्याची सवय झाली आहे आम्हांस. आणखी कोण-कोण फिरले? सांगा.” खासेवाड्याच्या बैठकी दालनभर शांत फिरत राहिले महाराज. जागजागी उभ्या पहारेकऱ्यांनीही नावे ऐकण्यासाठी नकळत कान टवकारले. 👉“फितव्याच्या बाबी ऐकण्याची आम्हालाही सवय झाली आहे स्वामी - पण - पण आम्ही बोलणार आहोत ती बाबत फितव्याची नाही...!” पंतांनी हाती धरले उपरणे भावावेगाने चुरगळले. 🔊“मतलब?” राजांचा पायफेर गपकन थांबला. ते पेशव्यांच्या समोर येत त्यांच्या डोळ्यांत खोलवर बघत राहिले. “गंभीर आहे ही बाबत महाराज. कटावाची!!” पेशव्यांनी आपलीच गर्दन खाली टाकली. 👉 पाठीवर पाल पडल्यासारखेच वाटले, ते ऐकताना महाराजांना. ताणल्या डोळ्यांनी, सुक्च होत ते समोरचे न उकलणारे शून्यच बघत राहिले. मग एकदम कडाडलेच. 🔊“काय - बोलता काय पेशवे? औरंग, फिरंगी, हबशी, टोपीकर कुणा कुणास कमी वाटले? कशासाठी आणि कुणी-कुणी केला कटाव?” 👉“महाराज, शरम वाटते पण नको ती माणसं आहेत या कटावात. आपल...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १८९ ⚔️ ▶ पावसाने धार धरली. पुऱ्या सालभर दुष्काळाने हैराण झालेल्या रयतेला दिलासा मिळाला. त्यापेक्षा मोठा दिलासा मिळाला तैनाती मोगली सेना त्यांच्या भागातून उठल्या याचा. आता माणसे शिवाराच्या कामाला लागली. बालेकिल्ल्यातील खासेवाड्याच्या झरोक्यातून दिसणाऱ्या सरसरत्या पाणधारा बघत राजे विचारगत झाले होते. 'केवढा अटीतटीचा जंग खेळलो आम्ही औरंगशी! कशासाठी? कुणाच्या बळावर? का झाले घरचे असून पारखे शिर्के आणि फलटणकर? काय बाटत असेल पेडगावच्या कोठीत राणूआक्कांना?' 👉“महाराज, कुनी पठानी असामी आलीय पावसाचं गड चढून, भेट मागतीय.” पुरुषा नावाच्या चाकराने वर्दी आणली. थोड्याच वेळात तो एका उमद्या, लढाऊ पठाणाला घेऊन आत आला. त्याला बघताच महाराजांना वाटले याला पाहिले आहे कुठेतरी. पण कुठे? काही आठवेना - 👉“आदाबअर्ज - जिल्हे सुबहानी - मुल्के मऱ्हाट.” आल्या पठाणाने कुर्निसात दिला. त्याच्या पठाणी खमिसावरची कलाबतू झळझळली. 🔊“कौन? मिलनेका मतलब?” राजे त्याला निरखत अजून आठवू बघत होते. 🔊“पेहचाना नहीं राजासाबने नाचीजको?” पठाणी मोकळे हास्य खुलले. “नहीं. ब...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २२ एप्रिल इ.स.१६६७ महाराज आग्र्याहून अकस्मातपणे पळून गेल्यामुळे औरंजेबाची नाच्चकी झाली, संशयापोटी त्याने मिर्झा राजांना दक्षिणेतून परत बोलवण्याचा हुकुम सोडला आणि औरंगाबादेस शहजादा मुअज्जम याला सुभेदार म्हणून नियुक्त केले, याच संधीचा फायदा घायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले आणि नरमाईचे धोरण स्वीकारून मुअज्जम सोबत बोलणी सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबास २२ एप्रिल १६६७ रोजी एक पत्र लिहिले “हा बंदा गुलाम आपली नोकरी करून हुकुम पाळण्यात मोठे भूषण मनात आहे हिंदुस्तानच्या बादशहाची फौज मजवर चालून येत आहे त्यास टक्कर देण्याचे सामर्थ्य कोणात तरी आहे काय ? म्हणून माझी विनंती आहे कि माझा मुलगा संभाजी यास ४ हजाराची मनसब मिळावी माझ्याकडे जे किल्ले होते ते मी अगोदरच बादशाहाला दिले आहेत आणि माझी सर्व जिंदगी आपल्या सेवेस अर्पण आहे” (शि.प.सा.सं.ले – ११५८) हे पत्र वाचून औरंगजेबाने महाराजांच्या वकिलास बोलावले आणि म्हणाला - “तुझ्या मालकास जाऊन त्यास कळव कि तुझे अपराध आम्ही माफ केले आहेत, आणि तुझ्या मुलास चाकर ठेवून घेतले आहे जो विजापुरी मुलुख तू...