ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ७ जुन इ.स.१६४९ एका खुर्दखतानूसार चाकण परगणा महाराजांकडे ! राजे शहाजीराजे विजापुरकडेच असल्यामुळे पुढील ४, चार ते ५, पाच वर्षाच्या काळात महाराजांनाही स्वराज्य विस्तारासाठी विशेष हालचाली करता आल्या नाहीत. या काळातील महाराजांच्या सत्तेतील झालेली चढ उतार म्हणजे फतहखान स्वारी पुर्वी घेतलेला किल्ले पुरंदर आदिलशहाने महाराजांकडेच ठेवला. तर तत्पुर्वी घेतलेला कोंढाणा मात्र आदिलशहाला परत द्यावा लागला. खुर्दखतानूसार चाकण परगणा महाराजांकडे आलेला दिसतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ जुन इ.स.१६६६ (ज्येष्ठ वद्य प्रतिपदा, शके १५८८, संवत्सर पराभव, वार गुरुवार) महाराज सुटकेच्या मार्गाच्या शोधात! महाराज सुटण्यासाठी अनेक मार्ग शोधत होते. परंतु रामसिंह दुहेरी कात्रीत सापडला होता. मिर्झाराजे जयसिंहच्या शब्दात रामसिंह एकीकडे आडकला होता. तर महाराजांना जामीन राहून औरंगजेब बादशहाने रामसिंहाला दुसऱ्या बाजूने जामिनकीतून मोकळे होण्यास सांगितले मात्र रामसिंहाने तसे करण्यास साफ नकार दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ जुन इ.स.१६८१ मुल्हेर किल्ल्याचा किल्लेदार...