Posts

Showing posts from March 21, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜२१ मार्च इ.स.१६५७ चैत्र वद्य द्वितीया, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार शनिवार, म्हणजेच आजच्या दिवशी, महाराजांनी न्यायदान केले! गुंजण मावळ्याच्या देशमुखीबद्दल शिलीमकरांमध्ये कलह उत्पन्न झाला होता. शिलीमकरांची भाऊबंदकी फार जुनी होती. चंद्ररावाने मात्र भाऊबंदकीचा फायदा घेत शिलीमकरांना महाराजांच्या पक्षातून फोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र शंभुमहादेवाची व आईसाहेबांची आण घेऊन महाराजांना सत्यता पटवून द्यावी लागली. इतके हे महत्वपूर्ण प्रकरण होते. त्यामुळेच सर्व अधिकारी पुण्यास जमले असताना महाराजांनी शिलीमकर वतनाचा तंटा लालमहालात बसून आई जिजाऊंच्या समवेत सर्व संमतीने सोडविला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜२१ मार्च इ.स.१६५७ छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे सरनोबत म्हणून 'नूरखान बेग' यांना सन्मान व सैन्याचे नेतृत्व करण्याचे फर्मान लाल महाल -पुणे येथून दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜२१ मार्च इ.स.१६६७ किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्यात सामील..! किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून. छत्रपती शिवरायांनी गडदेवतांची पूजा केली समुद्राला नारळ अर्पण केला. सिद्...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १६३ ⚔️ ▶“धनी, धोंडश्यार् शाजाद्यांची दोन मान्सं आल्यात. मुशीनमान हाईत. खासगीनं भ्येटायची झ्यायली धरलीया त्येनी.” म्हलोजींनी छत्रपतींची विचारधारा तोडली. 👉महाराजांची चर्या त्रासिक झाली. अकबराची माणसे म्हणजे कसलीतरी मागणी असणार. त्यांना वाटले नकारच द्यावा म्हलोजींना; पण पडत्या पावसातून माणसे आलीत या एकाच विचाराने महाराज म्हणाले, “घेऊन या त्यांना.” शहजाद्याच्या खास मर्जीचा सरदार मिर्झा यहुद्दीन शुजाई आणि वकील अब्दुल हमीद यांना घेऊन म्हलोजी आले. त्यांना आत पेश घालून म्हलोजी बाहेरच उभे राहिले. 🔊“अस्सलामें सलाम.” मिर्झा शुजाई आणि अब्दुल महाराजांना तसलीम देत लवले. हात उठवून त्यांना दाद देत महाराज म्हणाले, “बोलो, क्या हे?” 👉दोघींनीही दालनभर नजर फिरवून कुणी नाही याची खातरी करून घेतली. 🔊“राजाजी की खैर हो। हम शहेनशाहके खरिदमतमें आये है।॥” अकबराचा उल्लेख “शहेनशाह' असाच शुजाईने केला. “ठीक.” महाराजांनी त्याला अधिक महत्त्व दिले नाही. 📜“आला हजरत की तर्रफसे राजाजीको खलिता है खलबत का!” शुजाईने अब्दुलकडे बघितले. अब्दुलने खिल्लतीआडची हिरवी...