Posts

Showing posts from June 30, 2020

छत्रपती शिवाजी महाराजांची बलस्थाने

Image
◆ शिवरायांची बलस्थाने "परराष्ट्रीय धोरण" - भाग ५ ◆ ▶शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? याबाबत काही जाबते आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. त्यांनी 'अरिमित्र विचक्षणा' कशी केली होती? स्वराज्य सुरवातीपासूनच चहुकडून शत्रुपक्षाने घेरलेले होते आणि राज्याला अंतर्गत शत्रू देखील खूप होते. ह्या दृष्टीने राजांनी परराष्ट्रीय धोरण कसे ठरवले आणि कसे राबवले हे समजून घेणे महत्वाचे आहे. अरि म्हणजे शत्रू किंवा जवळ ज्याचे राज्य तो. तर मित्र म्हणजे अर्थात सुहृदय.  ▶कौटिल्य अरिमित्राचे ६ प्रकार सांगतो. १. सहज शत्रू - राजाचे नातलग आणि सिमेलगतचे राष्ट्र. २. कृत्रिम शत्रू - आपल्या विरोधात जाउन इतर राज्यांना सुद्धा विरोध करण्यास भाग पाडणारा. ३. सहज मित्र - सिमेलगतचे राष्ट्र सोडून अन्य राज्यांचा राजा. ४. कृत्रिम मित्र - लाभ संपादन करण्याच्या दृष्टीने मैत्री ठेवणारा. ५. मध्यम - संधीविग्रहात अनुकूल असलेला. ६. उदासीन - बलवान असून मैत्री ठेवणारा. स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सहज शत्रू राष्ट्र होते. शिवाय मुघल सुद्धा स्वराज्याचे सहज शत्रू होतेच. ...