ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 १२ एप्रिल इ.स.१४८२ मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ एप्रिल इ.स.१६७३ (वैशाख शुद्ध षष्ठी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार शनिवार) महाराज पन्हाळगड मुक्कामी! सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी धर्मवाट देऊन बेहलोलखानास सोडून दिल्याची वार्ता महाराजांना कळली होती. त्यामुळे महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यामुळे सरसेनापती प्रतापराव गुजर स्वराज्यात न जाता अथणी आणि हुबळीच्या रोखाने दौडू लागले. हुबळीची लुट करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अथणीवर धाड टाकली. कारवार प्रांतात सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी मांडलेली धुम पाहून बेहलोलखानाने कोल्हापूर भागात सैन्यांची जमवाजमव करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार होता. मात्र याच वेळी महाराज खुद्द पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता बेहलोलखानाच्या कानी गेली. त्याचबरोबर पावसाळाही जवळ असल्याने बेहलोलखानाने इथे फा...