Posts

Showing posts from March 20, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २० मार्च इ.स.१६०२ शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात इ. स. १६४६ ते १६८० याकाळात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ह्या कालखंडात शिवरायांना मोगलांशी व विजापूर सुलतानाशी लढावे लागले. महाराष्ट्रात व दक्षिण हिंदुस्तानात पश्चिम व पूर्व किनाऱ्यावर युरोपियन राष्ट्रांच्या कंपन्यांनी व्यापाराकरिता ठाणी स्थापन केली होती. शिवपूर्व कालात इ. स. १४९८ साली पोर्तुगीज खलाशी वास्को-डी-गामा हिंदुस्तानात आला त्यानंतर भारताशी व्यापार करण्यासाठी २० मार्च १६०२ रोजी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. डचांनी भारताच्या मलबार किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी वखारी स्थापिल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० मार्च १६६६ नेतोजी पालकर मिर्झाराजांच्या विनंतीमुळे विजापूरकरांना सोडून मोगलांना सामील. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० मार्च इ.स.१६८० (फाल्गुन अमावस्या, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार शनिवार) मराठा साम्राज्यास ग्रहण! युवराज राजाराम महाराजांचा विवाह उरकला आणि त्यानंतर फाल्गुनी अमावस्येला सूर्यग्रहण आले. पुष्कळदा निसर्ग भावी घटनांचे सुचन करीत असावा असे वाटते. महाराजांनाही पुढच्या अनिष्ट घटनांच...