नवरात्री विशेष
🎪 नवरात्री विशेष भाग : ४ 🚩 🔴 #दुर्गेचे_चौथ्या_रूप_कुष्मांडा' 🔴 ▶प्रार्थना : 🔸 सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च। दधाना हस्तपदमाभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु में।।🔸 ▶ स्तुति : 🔸या देवी सर्वभूतेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥🔸 नवशक्तीपैकी 'कुष्मांडा' हे दुर्गेचे चौथ्या रूप आहे. ▶ दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते. 👉 नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. 👉 या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. त...