ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️ 📜 २२ जानेवारी इ.स.१६६६ शहाजहान बादशहाचे निधन ! शके १५८७ च्या पौष व. १३ रोजी मोगलांचा पांचवा बादशहा शहाजहान याचे निधन झाले. शहाबुद्दीन मुहमद किरान उर्फ शहाजहान हा जहांगीर ऊर्फ सेलीमचा जोधपूरच्या राजकन्येपासून झालेला पुत्र होय. सन १६२८ मध्ये हा गादीवर आला. सर्व आप्तांचा नायनाट करून याने सन १६३७ मध्ये शहाजीचा पराभव केला व अहमदनगरचा सर्व मुलूख आपल्या ताब्यात आणला. युरोपियन लोकांच्या बाबरतीत हा मोठा धूर्त होता. त्यांनी धर्माच्या बाबतीत हात न घालावा म्हणून हा अत्यंत दक्ष असे. पोर्तुगीझ धार्मिक जुलूम करतात, म्हणून याने हुबळी नदीच्या काठी असलेली त्यांची वखार छुटली. असफखानाची मुलगी मुमताज ही शहाजहानची बायको होती. या मुमताजवर त्याचे फारच प्रेम होते. तिच्याच स्मरणार्थ याने जगप्रसिद्ध अशी ताजमलची इमारत बांधली. असे सांगतात की, या इमारतीच्या बांधकामावर वीस हजार मनुष्ये बारा-तेरा वर्षे खपत होती. एकूण खर्च नऊ कोटी, सतरा लाख रुपये झाला. याची कार कीर्द म्हणजे मोघल अमदानीचे सुवर्णयुग होय. हल्लीचे दिल्ली शहर यमुनेच्या काठावर यानेच बसविले. हा मोठा विलासी व रंग...