Posts

Showing posts from March 18, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 १८ मार्च इ.स.१६७९ (चैत्र वद्य प्रतिपदा, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार मंगळवार) कोप्पळ स्वराज्यात दाखल! कोप्पळचा किल्ला ३ मार्च इ.स.१६७९ रोजी जिंकल्यानंतर दोंडा बाळापुर व बहादुर बिंडा ताब्यात घेतला. आणि कोप्पळ स्वराज्यात दाखल केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १८ मार्च १६८० सर्जाखानाला विजापुरी सैन्याचा मुख्य सेनापती केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १८ मार्च इ.स.१६८८ हरजीराजे महाडिक त्रिणामल्लीहून कंचीवर गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १८ मार्च इस.१६८९ १८ मार्च १६८९ रोजी खर्डी गाव सोडून मातबरखान पुढे निघाला. माहुली गडावरून एक हजार घोडेस्वार सैनिक आक्रमण करण्याकरता निघाले असल्याची त्याला वार्ता कळली. मराठे सैनिकांनी अवघड खिंडीचा व ठिकाणांचा आश्रय घेतला होता. हे वृत्त मातबरखानाला समजल्यावर त्याने हाजी अहमद बेग, विक्रम श्रीपत हा जव्हारचा जमीनदार आणि इतर अधिकाऱ्यांना घोडेस्वार, पायदळ आणि बंदुकधारी सैनिकांसह लढण्याकरता रवाना केले. तेव्हा सुमारे तीन तास बंदुका आणि बाणांचे युद्ध झाले. कित्येक मराठे सैनिक मरण पावले, जखमी झाले असे वृत्त मातबरखानाने और...