ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶📜 ११ मार्च इ.स.१६७७ दक्षिणदिग्विजय मोहिम दि. ११ मार्च १६७७ रोजी, राजे हैद्राबादहून निघाले . महाराज जिंजी, वेलोर, यमन गोंडा, आणि पोर्तो नोव्होचा कर्नाटकचा भाग विजापूरच्या ताब्यातून घ्यावयास निघाले. कुतुबशहाने १ हजार घोडदळ, ४ हजार पायदळ आणि एक अनुभवी सेनापती राजांच्या बरोबर दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶📜 ११ मार्च इ.स.१६७९ (चैत्र शुद्ध दशमी, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार मंगळवार,) आनंदरावांनी कोप्पल पाठोपाठ विजापुरकरांकडून दोड्डा बाळापुर जिंकले. किल्ले पन्हाळा प्रांतापासून जिंजीपर्यंत सलग भुमी स्वराज्यात दाखल करण्याच्या उद्देशाने सतत मोहीमा आखण्यात आल्या होत्या. कुठे हंबीरराव, कुठे मोरोपंत, कुठे आनंदराव यांनी स्वराज्य हेच स्वकार्य मानून यज्ञ आरंभला होता. कोप्पल पाठोपाठ आनंदरावांनी विजापुरकरांकडून दोड्डा बाळापुर जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶📜 ११ मार्च इ.स.१६८९ (फाल्गुन वद्य अमावस्या शके १६१० सवंस्तर विभव वार सोमवार) #छत्रपती_संभाजी_महाराज_बलिदानदिन... औरंगजेबाची अखेरंची सजा, "छत्रपती संभाजींच मस्तक कलम करा...