ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶📜 १० मार्च इ.स.१६४९ स्वराज्य संकल्पक थोरले महाराज साहेब "शहाजीराजे" यांना कैद करून आदीलशाही सरदार "अफझलखान" विजापूर मध्ये आला. यावेळी "किल्ले जिंजी" ची अपार लूट एकूण ८६ हत्तींवर लादून त्याने विजापूरात नेली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶📜 १० मार्च इ.स.१६७३ किल्ले रायगडहून किल्ले पन्हाळगडाकडे जाताना वाटेत छत्रपती शिवरायांचा किल्ले प्रतापगडवर मुक्काम. प्रतापगडावर भवानी देवीची महाराजांकडून पूजा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶📜 १० मार्च इ.स.१६७७ ५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीमध्ये हैदराबाद येथील भागानगर मधील मुक्काम आटोपून छत्रपती शिवरायांचे दक्षिण दिग्विजयसाठी दक्षिणेकडे प्रस्थान. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶📜 १० मार्च इ.स.१६७९ मुंबईकर इंग्रजांचे सुरतेला पत्र दिलेर ने दिलेरपणे छत्रपती संभाजीराजांचे स्वागत करताना एक हत्ती, तीन घोडे, पोशाख, तलवार, चौघडा हा नजराना दिला. शिवाय छत्रपती संभाजीराजांना ७००० स्वार आणि ७००० जातीच्या मनसबीचे आलमगीर बादशहाचे फर्मान हाती दिले. छत्रपती संभाजीराजे दिलेरच्या छावनित आल्याने दिलेरला...