ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️ १४ जानेवारी इ.स.१६४१ शहाजीराजांचे कोंडदेवांना पत्र शहाजीराजांना सूनमुख पाहण्याची उत्सुकता वाटली असणे स्वाभाविक आहे. पत्नीची व शिवबाराजांची भेट होऊनहि एक वर्ष झाले होते. शिवाय शिवबाराजे, जिजाऊसाहेब यांचा व शंभूराजांचीहि भेट बरेच दिवसात झालेली नव्हती, कर्नाटकचा नवा मुलुखहि त्यांनी पाहिलेला नव्हता. त्यामुळे शहाजीराजांनी दादोजींना पत्र पाठवुन त्यांना बंगरुळास बोलावुन घेतले. बंगरुळास जाण्यापूर्वी दादोजींचा इकडिल उल्लेख असलेला शेवटचा महजर १४ जानेवारी १६४१ या तारखेचा आहे. व यापुढील एकदम ३० मे १६४२ चा आहे. बंगरुळास ही मंडळि निघाली ’ते समयास राजियास वर्षे बारा होती’ असे सभासद म्हणतो. हा उल्लेख अचूक आहे कारण फेब्रुवारी १६४१ मध्ये महाराजांना १२ वे वर्ष लागते. म्हणाजे फेब्रुवारी मध्ये महाराजांसह दादोजी कर्नाटकात रवाना झाले. दादोजिंच्या अनुपस्थितीत पुणे प्रांत सिद्दि अंबर याकुतखानाकडे होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️ १४ जानेवारी इ.स.१६४८ कोकण मोहिम आटोपून शिवाजी राजे राजगडावर आले. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवाजी राजांनी आपल्या नव्या राजधानीवरील वास्तूत गृहप...