नवरात्री विशेष
🎪 नवरात्री विशेष भाग : ७ 🚩 🔴 #दुर्गेचे_सातवे_रूप_कालरात्री' 🔴 ▶प्रार्थना : 🔸 एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित। लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी।। वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा। वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।।🔸 ▶ स्तुति : 🔸या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥🔸 नवशक्तीपैकी ' कालरात्री ' हे दुर्गेचे सातवे रूप आहे. दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' ▶ दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते. 👉या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमा...