Posts

Showing posts from September 14, 2020

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - २  ⚔️ बाजींद या बहिर्जी नाईक यांच्या कहाणीच्या २ऱ्या भागात आपले स्वागत आहे. मल्हारी,सर्जा आणि नारायण प्रश्नार्थक मुद्रेने सखाराम कडे पाहू लागली. सारा गाव ज्या गोष्टीमुळे गेली ५-६ वर्षे भीतीच्या दडपणाखाली आहे,त्या गोष्टीजवळ येऊन हा माणूस त्या गोष्टीला जवळून पाहूया कसा काय म्हणत असेल हा प्रश्न तिघांना पडला होता. सखाराम ने तिघांच्याकडे पाहत उचश्वास टाकत बोलला..! अरे आजवर घर-संसार पाहतच आलोय आपण,देवाच्या दयेने आसपास च्या बारा वाड्यात चांगलं नाव हाय आपलं. ही असली मेलेली मढी किती दिस भ्या घालणार आपणाला. हे बगा, खंडोबाचा भंडारा लावलाय आपण भाळाला, जरा धीर धरुन ती मढ बघुया,म्हणजे वर गडावर गेल्यावर बोलायला तोंड मिळलं आपणाला,राजा देवमाणूस हाय आपला,आपल संकष्ट नक्की त्यांच्या ध्यानी येईल…चला,खंडेरायाच नाव घ्या आणि या माझ्या मागं…! सखाराम च्या असल्या बोलण्याने तिघांनीही धारिष्ट्य केले आणि मान हालवून टकमक दरीकडे पाय वळवले. एव्हाना रिमझिम पाऊस थांबला होता,आणि कोवळे उन्ह अंगावर पडू लागले होते. घोड्याला पण उन्हामुळे चांगली उब मिळत होती,तो पण मनोमन सुखावला होता. रायगड ची उंची ...