बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )
🚩 बाजींद भाग - २२ ⚔️ ▶खंडोजी ने मोठ्या धाडसाने बाजींद चे ते गूढ ज्ञान लिहलेली वही शिवछत्रपतीचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांना सोपवून ते ज्ञान हिंदवी स्वराज्याच्या कामी यावे यासाठी ती जिवावरची जोखीम पत्करली. त्या रात्री बाजींद ने चंद्रगड ची ती मूठभर मात्र चिवट फौज आमच्या रक्षणास ठेवली व तो जंगलात काहीतरी उद्देशाने निघून गेला. सावीत्री बोलत होती आणि सखाराम व त्याचे साथीदार जेवण आटोपून थंडगार हवेच्या झुळकात ढगाळलेल्या रात्री ती रहस्यमय कथा ऐकत होते….! सखाराम बोलला….”बाईसाहेब…बहिर्जी नाईक यांचे नाव मी पण ऐकले आहे, स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख……पण, बाईसाहेब पुढे काय घडले…” ▶सावित्रीने पुन्हा दीर्घ श्वास घेतला आणि ती बोलू लागली…..! खंडोजी व मी मोठ्या उत्सुकतेने सारा चंद्रगड परिसर न्याहळत होतो व बाजींद च्या परतण्याची वाट पाहत होतो पण, तितक्यात जंगलात काहीतरी चमकले….क्षणाचाही विलंब न करता बाजींद ची फौज त्या दिशेने दौडू लागली…पाहतो तर एक किडकिडीत बांध्याचा ,काळा पोषाख परिधान केलेला “निशाणबारदार हारकारा” वाऱ्याच्या वेगाने नदीकडे धावू लागला…बघता बघता त्याने नदीत उडी मारुन पलीकडच्या दाट...