Posts

Showing posts from November 12, 2020
Image
सर्वाना माझ्याकडून दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिपावली आपणास तसेच आपल्या परिवारास आनंदाची ,भरभराटीची , सुख समृद्धीची जावोत हीच देवांचे देव महादेवां चरणी प्रार्थना ! . ☀ वसुबारस म्हणजेच दीपोत्सवास खर्‍या अर्थाने प्रारंभ     🌺 वसुबारस (गोवत्स द्वादशी) 🌺  ☀इतिहास : समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.  ☀उद्देश : या अन् पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरिरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावे.  ☀ सण साजरा करण्याची पद्धत : या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात. गोमातेला करावयाची प्रार्थना ! 🙏प्रजापती ब्रह्मदेव, विष्णु आणि महादेव या प्रमुख देवतांनी गायींची स्तुती करतांना म्हटले आहे,  🌺त्वं माता सर्व देवानां त्वं च यज्ञस्य कारणम् ।  त्वं तीर्थ सर्वतीर्थानां नमस्तेस्तु सदानधे । ☀अर्थ : हे पापहरिते ! तू सर्व देवतांची माता आहेस. तूच यज्ञाचे कारण आहेस. सर्व तीर्थांचे तू महातीर्थ आहेस.  तुला सदा नमस्कार असो.  ☀सत्...