ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २१ फेब्रुवारी इ.स.१६६२ इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती. भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "जे इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २१ फेब्रुवारी इ.स.१६६५ कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहे.त्याच रात्री स...