Posts

Showing posts from March 1, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 १ मार्च इ.स.१५७२ प्रतापसिंह महाराणा झाला प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 १ मार्च इ.स.१६३० शाहजहान बऱ्हाणपूरला पोहोचला. इथे रावरतनच्या हाताखाली दहा हजारांचे दळ बनवले. वाशीमची बाजू धरून ठेवणे व तेलंगाण नियंत्रणा...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १४५ ⚔️ ▶ “गडाचा बंदोबस्त झाला आहे. टाकीनं निघून यावं.” येसाजी कंक आणि पिलाजीमामा यांचा निरोप मिळताच पाचाड सोडून संभाजीराजे हंबीररावांसह रायगड चढू लागले. त्याच्या मागून पाच हजार मावळा गडचढीला लागला. चित दरवाजासमोर येताच संभाजीराजे थबकले. 'जेव्हा इथून निघालो तेव्हा बरोबर महाराजसाहेब होते आणि आज... ' थरथरल्या हाताने त्यांनी दरवाजाच्या उंबरट्याला स्पर्श करून आत पाय ठेवला. 👉हंबीररावांनी इशारत केलेले भोई पावसाच्या सरी तरू लागताच रिकामी पालखी घेऊन युवराजांना गाठीत होते. हातपंजा डोलवून ती नाकारत संभाजीराजे दरडीच्या झाडाखाली आसरा घेत होते. सरी सुमार होताच पुन्हा गडचढीला लागत होते. पाठचा मावळा घोंगड्यांच्या खोळी पांघरून पावसाला दाद न देता गड चढत होता. लहाना दरवाजा मागे पडला. रायगडाचे आघाडी मनोरे दिसू लागले. 👉काठभरल्या गंगासागरावर नजर टाकून संभाजीराजे मनोऱ्यात आले. तिथे गडाच्या अठरा कारखान्यांतील माणसेच माणसे दाटीने उभी होती. त्यातून पांढऱ्या गलमिश्यांचे येसाजी कंक पुढे आले. ते मुजऱ्यासाठी झुकणार एवढ्यात झेपेने पुढे होत संभाजीराजे...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १४४ ⚔️ ▶ मल्हारबुवांशी जिव्हाळ्याची चर्चा करून संभाजी राजांनी कोरटीचा मठ सोडला. त्यांचे मन समाधान पावले होते. दुडक्या चालीने दौड घेत असताना ते हंबीररावांना म्हणाले, “मामासाहेब, कऱ्हाडतर्फेच्या देशाधिकारी भानाजी गोपाळांना पत्र देण्यास सांगा चिटणिसांना - “आम्ही गोसावीबुवांचे दर्शन घेतले. संभाषण प्रसंग झाला आहे. बुवा सदाव्रती, प्रामाणिक ईश्वरभक्त आहेत. मौजे नाडोली गाव त्यांचे मठास अग्रहार करून चालविणे. उजूर व हरकत न घेणे.”📜 जी.” हंबीररावांनाही तो निर्णय ऐकून समाधान वाटले होते. 'चंद्रावत ' फौज गाठण्यासाठी आडव्या वाटेने वाईच्या रोखाने दौडत होता!🏇🏇🏇 संभाजीराजांचा मेळ पडताच फौजेचा तळ एक मुक्काम करून वाईहून हलला. महाबळेश्वरमार्गे, रडतोंडीच्या घाटाने प्रतापगडाच्या खोरीवर आला. 🎪कुलदेवता भवानीचे स्थान असलेल्या प्रतापगडाचे शिखर दिसताच मान लवती करून संभाजीराजांनी त्याला वंदन दिले. वरकड फौज घाटमाथ्यावरच ठेवून हंबीरराव, रूपाजी, महादजी, रायाजी-अंतोजी अशा शेलक्या मर्दान्यासह, पाचशे धारकरी घेऊन ते खोरीत उतरले. भवानीची पायधूळ घेण्यासाठी प्रता...