बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )
🚩 बाजींद भाग - ४० ⚔️ ▶ते मटकन खालीच बसले …..आता मात्र त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता…….! मनात काहीतरी विचारांचा गोंधळ सुरु झाला त्यांच्या आणि त्यांनी सोबत आणलेल्या शिलेदारांपैकी पाच जणांना आज्ञा केली …..गड्यानो तुम्ही त्वरित रायगड गाठा. महाराजाच्या खासगीत माझा निरोप पोच करा.. असे म्हणत त्यांनी एकाच्या कानात एक निरोप सांगून त्या पाच जणांना रायगडी रवाना केले. आणि सखाराम कडे पाहत तो बोलला… सखाराम, तुम्हाला ज्या महादेवाच्या मंदिरात सावित्री भेटली तिथे मला घेऊन जाऊ शकाल ? जी..जी..होय …इथून ४-५ कोसावरच असेल ते मंदिर…चला मी नेतो. असे बोलताच वस्ताद काकांनी सोबत उरलेल्या पाच धारकांची दोन तुकडीत विभागणी केली. २ जणांनी इथेच थांबा…सोबत आणलेला भगवा ध्वज एका काठीला बांधून इथेच थांबा..रायगडावरून काही लोक आले तर त्यांना समजायला सोपे जाईल. आणि उरलेले दोघे…. तुम्ही आमच्यासोबत चला.. ▶असे म्हणत सखाराम व त्याचे सवंगडी, वस्ताद काका आणि दोन धारकरी असे सात जण त्या पडक्या महादेवाच्या मंदिराकडे जाऊ लागले. मजल दरमजल करत पठारी भाग संपवून सारे त्या भयान जंगलात घुसले. अनेक वळणे, ओढे नाले ओ...