ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१५७२ महाराना सांगाचा पुत्र उदयसिंहाचे निधन जेव्हा उदयसिंह आजारी पडला तेव्हा त्याने आपली आवडती राणी धीरबाई भटियाणी हिचा मुलगा जगमाल याला युवराज घोषित केले. आणि २८ फेब्रुवारी १५७२ साली उदयसिंहने प्राण सोडला. त्याकाळी अशी रीत असायची की जेव्हा राजा मरण पावतो तेव्हा त्याचा मोठा मुलगा(युवराज) अंतीमसंस्काराला जात नाहीत. लगेच सिंहासनावर बसतात, जेणेकरून सिंहासन रिक्त राहत नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१६४४ शहाजीराजे व आदिलशाहीतमधे तडे... रणदुल्लाखानच्या मृत्यूनंतर शाहजी व आदिलशाहतील अंतर वाढत गेले १२ मार्च १६४३ ते २८ फेब्रुवारी १६४४ च्या मधे कधीतरी रणदुल्लाखानचा मृत्यू झाला ह्यानंतर आदिलशाही दरबारात मुस्तफाखानचा दबदवा वाढला मुस्तफाखान बरोबर शाहजीराजेंचे फारसे चांगले संबंध नसावेत शाहजीराजेंला ह्यामुळेच चिंता वाटू लागली... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१६८२ सन १६८२ मध्ये संपूर्ण दख्खन काबीज करण्याकरीता औरंगजेब मोठ्या सेनासागरानिशी दक्षिणेत उतरला. दि. २८ फेब्रुवारी १६८२ मध्ये त्याने बुऱ्हाणपूर स...