Posts

Showing posts from July, 2020

शिवकालीन स्वराज्यातील किल्ले

Image
शिवकालीन_स्वराज्यातील_किल्ले_भाग_२ ★ लोहगड_किल्ला Lohagad Fort  ★   { पुणे जिल्हा } किल्ल्याचे  नाव : लोहगड किल्ला किल्ल्याची उंची : ३४२० फुट प्रकार : गिरीदुर्ग चढाईची श्रेणी : सोपी ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत जवळचे गाव : लोणावळा, मळवली डोंगररांग : मावळ हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावरील मळवली स्थानकापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. रेल्वेस्थानकाच्या फलाटावर लोहगड विसापूर या जोडकिल्ल्यांची रेल्वेने मुळी पाटी लावून जाहिरातच केलेली आहे. त्यावर लिहिलयं -“लोहगड, विसापूर फोर्ट-किल्ले” मळवली स्थानकबाहेर पडल्यानंतर नव्या द्रुतगती महामार्गावरील पुल ओलांडून पलिकडे जावे. साधारण अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर भाजे गाव येते. येथून एक पायऱ्यांचा मार्ग भाग्याच्या लेण्यांकडे जातो. तर दुसरी गाडीवाट लोहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या लोहगावाकडे जाते. लोहगावातून लोहगडाची तटबंदी आणि बुरूज लक्ष वेधून घेतात. चढायला सोपा असा हा दुर्ग सहजपणे काबीज करता येतो. गडावर एक सुंदर ...

शिवकालीन स्वराज्यातील किल्ले

Image
शिवकालीन_महाराष्ट्रतील_किल्ले_भाग-१ ★ शिवनेरी_किल्ला Shivneri Fort ★ { पुणे जिल्हा } किल्ल्याचे नाव : शिवनेरी उंची : ३५०० फूट. प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : मध्यम ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत जवळचे गाव : जुन्नर डोंगररांग : नाणेघाट स्थापना : ११७० ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. ◆ इतिहास : ‘जीर्णनगर’. ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापि...

हिंदवी स्वराज्याच्या अपरिचित पाऊलखुणा

Image
🚩 हिंदवी स्वराज्याच्या अपरिचित पाऊलखुणा - भाग १ ⚔️ ◆ मराठा घोडदळ ◆ || सरनौबतस्तु सेनानी: || अशी समर्पक व्याख्या देत राज्यव्यवहारकोशात सरनौबताचे वर्णन आले आहे. सरनौबत ही शिवकालातील अत्यंत मोठी आसामी. घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावर शिवकालात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे. दोन्ही विभागांचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत. ◆हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे पागा व्यवस्था थोडक्यात अशी होत : सरकारातून घोडा मिळणारा बारगीर -> २५ बारगिरास १ पखालजी १ नालबंद व १ हवालदार ५ हवालदारांचा मिळून १ जुमलेदार (पगार ५०० होन सालाना व पालखीचा मान) १० जुमलेदारांच्यावर १ हजारी (सालाना पगार १००० होन) ५ हजारींच्यावर १ पंचहजारी आणि या पंचहजारींच्या वर असणारा सरनौबत अंदाजे या सैन्य सरनौबतास सालाना ४००० ते ५००० होन इतका पगार होता. ◆ शिवकालात सरनौबत कोण होते आणि कधी होते हे : सरनौबताचे नाव, नियुक्ती काल व सैन्य प्रकार ★तुकोजी चोर १६४०-१६४१ दरम्यान ★नुरखान बेग १६४३ पायदळ ★माणकोजी दहातोंडे १६५४ घोडदळ ★...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩 बाजींद भाग - १ ⚔️ ▶बाजींद या बहिर्जी नाईक यांच्या कहाणीच्या १ल्या भागात आपले स्वागत आहे. रायगड च्या डोंगरदरीत “धनगरवाडी” हे खुप जुने गाव. सखाराम चा जन्म याच गावचा. शिवाजी महाराजांनी रायगड स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला आणि आसपास च्या छोट्या छोट्या खेड्यांचं सोनं झाला. जीवन स्थिर झालं. नाहीतर कोण कुठला विजापूर,दिल्लीचा बादशहा कुठल्या सरदाराला पाठवून गावाची राखरांगोळी करेल सांगता येत नव्हते. रायगड किल्ल्यावर “टकमक” टोक नावाचा एक प्रचंड सुळका आहे,या सुळक्यापासून खाली हजारो फूट खोल दरी असायची. स्वराज्याशी हरामखोरी करणारे फितूर याच टोकावरुन खाली पाताळात ढकलून दिले जायचे. टकमकाच्या बरोबर खाली बाजूच्या १० कोसावर दाट जंगलात धनगरवाडी हे गाव. स्वराज्याशी फितुरी करणारे हरामखोर टकमकावरून खाली फेकले जायचे तेव्हा हजारो फूट खाली धनगरवाडी जवळ पडायचे. अक्षरश चिखल व्हायचा त्यांच्या देहाचा..! काही दिवस कोलह्या कुत्र्यांची मेजवानी झाली,पण जंगली जनावरांचा सुळसुळाट झाला त्या मुळे..! जंगलातील जनावरं माणसाच्या रक्ताला चाटवली आणि मग जेव्हा टकमकावरून कोणी हरामखोर खाली येईना, त्यावेळी भुकेने...

◆ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ◆

Image
◆ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ◆ { वाचा आणि शेअर करा ही विनंती } ▶इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही” हाही एक इतिहास आहे. ‘निरक्षरं मराठ्यांचा’ इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका “तेजस्वी” आणि “ओजस्वी इतिहास याच मातीत घडला मात्रं ‘साक्षरं मराठे’ त्यापासून बेदखल राहिले कि काय? अशी शंका अलीकडे येऊ लागली आहे. पण! “शिवशंभू” चरित्राचं कर्तृत्वं ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं एकवटतो एवढी एकचं गोष्ट तुमच्या आमच्या काळजामध्ये “राजा शिवशंभू” अजूनही जिवंत आहेत. याचीच ती साक्षं.”इथल्या मातीचा एखादा ढेकूळं कधी हातात घेतला तो पाण्यात टाकला,तरं पाण्यावरं जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल… आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही,”या सह्याद्रीच्या पायाखाली काहीजणांनी स्वतःला गाडून घेतलयं तेव्हा तो सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेला !या सह्याद्रीची सैरं करणं कोणा ऐऱ्याचं गैऱ्याचं काम नाही, सह्याद्रीची सैरं फक्तं तीघचं करू शकतात. पहिला”वाघ”,दुसरा”वारा” आणि तिसरे”मराठे” या त...

छत्रपती शिवाजी महाराजांची बलस्थाने

Image
◆ शिवरायांची बलस्थाने "आरमार" - भाग ६◆ ▶"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र... याकरीता आरमार अवश्यमेव करावे." अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री शिवछत्रपति महाराजांची दूरदृष्टि थक्क करून सोडते. इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवल आहे 'बरे झाले हा शिवाजी डोंगरी मूलखात जन्मला. जर हा सागरकिनारी जन्मता तर आमच काही खरे नव्हते.' मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापार यांची खंडीत झालेली परंपरा सुरु केली ती शिवरायांनी. १६५७च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न त्यांनी केला तेंव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते. परकीयांचा कावा शिवरायांनी त्वरीत ओळखला होता. एका पत्रात ते म्हणतात,"सावकारांमध्ये फिरंगी (पोर्तुगीझ), इंग्रज, फरांसीस (फ्रेंच), डिंगमारांदी (डच?) टोपीकर हेहि सावकारी करितात. ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्याच करितात. त्यांचे हुकुमान...