Posts

Showing posts from November, 2020

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ५० ⚔️ 👉बाजींदचा शेवटचा भाग🙏 ▶सखाराम….हे …हेच आहेत आमचे "बहिर्जी नाईक"…! "हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख". आणि सखाराम च्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला सर्व गोष्टीचा उलघडा होऊ लागला, की उंबराच फुल म्हणताच आम्हाला रायगडावर एव्हढा का मान मिळत होता….आमचा घोडा हा जवळ असला की का पळून जात होता. पण, बहिर्जी नाईकांनी सखाराम बनून का आम्हास्नी रायगड दावला..आणि रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे गायब होत होता….हा प्रश्‍न मात्र सखाराम ने बहिर्जी नाईकांना केला….! नाईक हसले आणि बोलले…..गड्या, या खंडोजी ने स्वराज्यासाठी खूप काही भोगले आहे, हा वेडा स्वताहून तर काय हे लोकांना सांगणार नाही, म्हणून तुमच्या कानावर याची महती घातली. रात्रीच्या वेळी स्वराज्याच्या महत्वाच्या बातम्या स्वराज्यातील अनेक हेराकडून मला मिळत असायच्या त्यामुळे मला जावे लागत असे, पण सावित्रीने मला या कमी खूप मदत केली..जराही शंका न येऊ देता तुम्हाला सर्वकाही समजून सांगितले तिने…! आणि वस्ताद काकासारखा निष्ठावान हेर नक्कीच याचा मागोवा काढत तुम्हाला इथवर आणणार हे आम्हाला ठाऊक होते…काय काका बरो...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४९ ⚔️ ▶स्वराज्याची राजधानी म्हणून आम्ही रायगड निवडला, पण त्या राजधानीच्या अस्तीनीतील निखारे तुमच्या मुळे बाजूला झाले…आता आमच्या डोक्यात केवळ दक्षिण-दिग्विजय आहे…! राजे सावित्रीकडे पाहत बोलले…..सावित्री..तुझ्यासारख्या मुली ही खरी स्वराज्याची दोलत आहे. चुलीपुढे काम करणारे हात स्वातंत्र्यासाठी रणांगण गाजवू शकतात हे तुझ्या कृतीने तू दाखवून दिल्रेस…खंडोजी, तू मोठा भाग्यवान आहेस, तुला सावित्री सारखी पत्नी मिळत आहे..खंडोजी मान खाली घालून केवळ ऐकत होता…! आणि बाजिंद. राजांच्या आवाजाने बाजिंद ने पुन्हा मुजरा केला. राजे बोलू लागले. महाराष्ट्र ही बुद्धिवंतांची जननी, पण बुद्धी बरोबर कर्तव्य, स्वाभिमान, संस्कृतीची जपणूक करणारे तुमच्यासारखे वीर आम्हाला भेटले नसते, तर असे हजारो शिवाजी मिळूनही महाराष्ट्र स्वतंत्र झाला नसता…! ▶यावर बाजिंद बोलु लागला. राजे…..असे बोलून मला लाजवू नये…..१०० वर्षे आम्ही आमच्या मूळ पुरुषाचा हा अनमोल ठेवा जणू काही तुमची वाट बघत जपला होता…आता आम्हाला मरण जरी आले तरी आम्ही तयार आहोत. हिंदवी स्वराज्याचे हे पवित्र कार्य, आसेतु हिमाचल असेच सुरु राहील यासा...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४८ ⚔️ ▶साऊ…ज्यांच्यामुळे हा खंडोजी घडला, हे माझे वस्ताद काका…! सावित्री पुढे आली आणि तिने वस्ताद काकांचा आशीर्वाद घेतला…! राजे येसाजीराव बोलले……वस्ताद काका…आता आम्हीही तुमच्या खांद्याला खांदा लावू लढणार स्वराज्यासाठी…! सखाराम हे सारे भरल्या डोळ्यांनी पाहत होता…काय ही वेडी माणसे आहेत. वयाचा उत्तरार्ध सुरु आहे, मरण केव्हाही यांना गाठेल असे वय जगत आहेत, मात्र भाषा करत आहेत स्वराज्यासाठी लढायची….. खरोखर ही हिंदवी स्वराज्याची मांदियाळी आमच्या नशिबी का नाही… किती दिवस आम्ही संसाराच्या गाडग्या मडकक्‍्यासाठी जगायचे…सखाराम चे अश्रू अनावर होत होते…! ▶दरम्यान जंगलातील पूर्वे बाजूकडून शिंगे तुतारी कर्णे गर्जू लागली…! 👉सर्वांनी ताडले……शिवरायांचे पथक आले. सारे गडबडीने तिकडे जायला निघाले. जंगलातील त्या पठारी भागात, एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज मानाने डोलत होता. मागोमाग पाचशे-सहाशे हत्यारबंद धारकरी दोडत येत होते. आणि एका काळ्या घोड्यावर खुद्द राजश्री छत्रपती शिवाजीराजे बसले होते. डोक्‍यावरील मंदीलाला मोत्याचे घोस लावून रोवलेला तुरा हिन्काळत राज...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४७ ⚔️ ▶गुप्तता हा स्वराज्याचा आत्मा आहे, पण इतकी बेमालून गुप्तता राखून तुम्ही जे काही काम केले आहे त्यासाठी या म्हाताऱ्या गुप्तहेराचा तुम्हाला मानाचा नाही काका……उलट मुजरा तुम्हाला असेल आमचा व खुद्द बहिर्जी नाईकांचा. ज्याला करंगळी धरून लहानाचे मोठे केले त्याला सुध्दा कर्तव्यात कसूर केली म्हणून आपण खंडोजी समजूनच कडेलोट केले ना… स्वराज्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे आहे हा शिवशाहीचा शिरस्ता तुम्ही जागून दाखवलात….तुम्हाला मानाचा मुजरा. वस्ताद काका व खंडोजी एकमेकांच्या मिठीत पडून रडू लागले. त्यांची ती विलक्षण गुरुशिष्याची भेट पाहून सखाराम, नारायण, सर्जा व मल्हारी सुद्धा रडू लागले होते…. ▶इतक्यात …..गुहेचा दरवाजा वाजला. खंडोजी ने दार उघडले, आणि बाहेर एक हेजीब वर्दी द्यायला आला होता…. तो बोलला……दस्तूरखुद्द शिवाजीराजांचे अश्वपथक जंगलाच्या पूर्वेकडून येताना दिसत आहे…! राजे येताहेत…..खंडोजी बोलला… तू चल पुढे…राजांच्या अश्वांचा ताबा घे…आम्ही क्षणात आलोच…! 👉खंडोजी बोलू लागला….. काका..चला महाराज येत आहेत. सोबत बहिर्जी असावेत…कारण यशवंतमाची जिंकून आसपासच्या १०० राज्यांची...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४६ ⚔️ ▶खंडोजी हसला आणि बोलू लागला. काका…..ही सारी कहाणी घडवली गेली ती बहिर्जी नाईकांनी…..! मोठा श्वास घेऊन खंडेराय त्याचा भूतकाळ सांगू लागला. त्या दिवशी तुम्ही मला यशवंतमाचीत भेटायला आलात आणि बहिर्जी नाईक माझ्यावर नाराज आहेत असे सांगून मला त्वरित त्यांची भेट घ्यायला सांगून निघून गेलात…तोवर जे घडले ते माझ्या बुद्धीने घडले. पण, बार्जिंद ची गूढ ज्ञानाची वही घेऊन मी नाईकांच्या गुप्त ठिकाणी असलेल्या एका गुहेत सुरक्षित ठेवायला गेलो आणि वही ठेवून मी परत यशवंतमाचीत जाणार इतक्यात त्या गुहेत खुद्द नाईक मला भेटले. जो वृत्तात मी तुम्हाला सांगितला, तोच वृत्तांत मी नाईकांना सांगितला. बराच विचार करून नाईकांनी मला नियोजन बदलण्यास सांगितले. आणि त्यानुसार मी चालू लागलो. मराठ्यांची चिवट फोज जिंकणे साक्षात यमालाही अजिंक्य आहे, मात्र मी भीमाचा वापर करून तुमचा हल्ला परतवल्रा. भीमाने यशवंतमाचीच्या गुप्त खबरा बाहेर देणे सुरु केले होते, आणि त्यायोगे सावित्रीसोबत लग्नाची स्वप्ने रंगवणे सुरु केले होते हे मना आधीच समजले होते, म्हणून त्याला संपवणे हे गरजेचे होते. ▶दरम्यान, बाजिंद चे ते...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - ७० ⚔️ ▶ अण्णाजी दत्तोंच्या मदतीने मुलखाची ऐनजिनसी जमाबंदी बांधून घेतली. आपल्या लष्कराला नवा कानुजाबता घालून दिला. कडक नियम जारी केले. “लष्कराने पाऊसकाळात चार मास आपल्या राहणीच्या मुलखावर जावे. शेतीभातीची कसणूक करावी. दसरा धरून साहेबकामावरी रुजू व्हावे. आठ मास मुलूखगिरी करोन पोट भरणे ते भरावे. स्वारीत बायाबापड्यांनी बदअमल करू नये. मुलूखगिरीस जाताना व देशी परते येताना सरकारी चौकी पहाऱ्यांबर जमेनिसास झाडा द्यावा. गैरवाका वर्तू नये. कानुजाबत्यास बाध आणील, त्याचे हात जल्लादाकरवी कलम होतील. ' असा लष्कराचा कडक जाबता राजांनी घालून दिला. जमीनधाऱ्याबद्दल मलिकंबरला मागे टाकील, असे धोरण राजांनी घालून दिले. “गावचा देशमुख, देशपांडा, पाटील आणि चार जाणते कदीम गावकरी अशा सात असामींनी मिळून जमिनीचा वकूब बघून प्रत ठरवावी. एकपिकी, दुपिकी अशी जमिनीची प्रतवारी लावावी. त्यामानाने सरकारी धारा बसवावा. जे रयतेस धारा नगद पैक्याचे रूपाने देणे निभत नसेल, त्याजकडून ऐनजिनसी धान्यरूपाने धारा वसूल घ्यावा. नांगर, बैल, बियाणे जो वस्तभाव कसणुकीस लागेल, तो सरकारफड...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४५ ⚔️ ▶बहिर्जी नाईकांच्या समाधीला दिवा लावून, त्यावर माथा टेकवून किसन धनगर आणि बाजीराव दिव्याच्या प्रकाशात बसले. गडावर पावसाने थंड वातावरण झाले होते, मात्र बाजींद च्या उत्कंठावर्धक कथेने ‘बाजीराव’ च्या उरात मात्र आग लागली होती. किसन धनगराने समाधीवर लावलेल्या दिव्याकडे पाहत भूतकाळातील स्मृती शब्दरूपी मांडायला सुरवात केली…..! ▶ 👉सखाराम ने वस्ताद काकांना ज्या जंगलात आणले होते, ते बाजींदचेच जंगल होते. काकांची व सखाराम ची सोबत त्यांच्या सवंगड्यांची चाहूल लागताच जंगलातील किडा, कीटक, मुंगी, पशु, पक्षी एकदम कोलाहल माजवू लागताच काकाना समजले कि आपण बाजींद च्या जंगलात आहोत आणि काही क्षणातच बाजींद आपल्या झेपा टाकत जंगलातील अनेक हिंस्त्र पशु समोरच्या झाडावर बसले. अनेक विषारी सर्पानी झाडाच्या फांद्याला वेढे देऊन बसले तर अनेक पक्षी आकाशात झेपावू लागले…, समोर एक धिप्पाड व्यक्‍ती वाघ सिंहाच्या समवेत येताना दिसू लागला…. ती चाल, ती नजर वस्ताद काकाना ओळखीची वाटली… वाटली नव्हे…ओळखीचीच आहे…. हा तर …हा तर….. माझा खंडोजी..माझा खंडेराय… काकांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले….. सखाराम...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - ६९ ⚔️ ▶ सगळ्या सदरकऱ्यांनी त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तींना मुजरे रुजू घातले. देवीचे दर्शन घेऊन शंभूराजे पुतळाबाईच्या महाली आले. त्यांना ओवाळण्यासाठी हाती घेतलेल्या आरतीच्या तबकाचे भान पुतळाबाईना राहिले नाही. त्या शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या. त्यांच्या सामोरे येत, त्यांची पायधूळ घेऊन शंभूराजे म्हणाले, “मासाहेब ओवाळता?” तेच शब्द, ओढ्यासारखे उड्या घेत येणारे, तेच डोळे दर्पणासारखे साफ. पुतळाबाईंच्या हातातील तबक थरथरत फिरू लागले. संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेला ताईत बाहेर काढला. तो आरतीच्या तबकात ठेवीत म्हणाले, “आम्ही सलामत आलो. येताना हा ताईत झोळीत ठेवीत होतो. झोळी खांद्यास असली की, कसलीच धास्त वाटत नव्हती.” “गुणाचाच आहे तो!!” पुतळाबाईंच्या मनी तबकातील ताईत बघताना विचार उठला. पुतळाबाईनी तबक चौरंगीवर ठेवले. आणि त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांनी पुन्हा तो ताईत उचलला! शंभूराजांच्या जवळ जात काहीच न बोलता, तो त्यांच्या दंडात बांधला आणि त्यांना आवेगाने जवळ घेतले. पुतळाबाईंना शंभूराजांच्यात एक विचित्र मुद्रा दिसली. सईबाईच्यासारख...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४४ ⚔️ ▶बाजीराव कडे गंभीरपणे पाहत तो म्हातारा गृहस्थ बोलला… कोण र तू..? हिकड मरायला पण कोण फिरकत नाय,आणि तू भर पावसात हित काय करतोय? बाजीराव या आकस्मित प्रश्नाने भानावर आला..तो बोलू लागला.. मी पलूस चा आहे मामा…बहिर्जी नाईकांच्या समाधीच्या दर्शनाला आलो होतो. मिलिटरी मध्ये असतो देशसेवेसाठी..! पण तुम्ही कोण…तुम्ही काय करताय इतक्या पावसात इकडे ? बाजीराव च्या त्या प्रश्नाने तो म्हातारा उत्तरत्रा… आर मी धनगर हाय…असतो शेळ्या मेंद्या घेऊन डोंगर दर्यात. किसन नाव माज…… गड्या, लरय नवाल वाटलं…हयात गेली बानुरगडावर येतुय…पण बहिर्जी नाईकांच्या दर्शनाला येणारे लय कमी जण असत्यात..बाकी सगळी टिंगल टवाळकी करणारीच जास्त येत्यात…बर वाटलं….! बाजीराव बोलू लागला…. मामा…तुम्हाला बहिर्जी नाईक यांच्याबद्दल काय माहिती आहे ? असेल तर मला सांगाल..? बाजीराव च्या डोळ्यात बहिर्जीच्या विषयी इतकी भूक त्या किसन धनगराला दिसली आणि तो मोठ्या आनंदाने त्याला बोलू लागला…. गड्या….बहिर्जी अस उभ्या उभी नाय समजायचं तुला, आम्हालाबी एवढ माहित नाय..पर जेवढ हाय तेव्हढ मातुर तुला सांगतो…लय मोठी कहाणी हाय .....

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४३ ⚔️ ▶साराह बोलत होती आणि बाजीराव ऐकत होता. बाजीराव साराह चा निरोप घेऊन विमानतळावर आला. प्रवासात डोक्यात फक्त आणि फक्‍त एकच विचार घुमत होता…बहिर्जी. किती मूर्ख आहोत आपण आणि आपले लोक. साऱ्या जगाला घाबरून सोडणारी मोसाद ही मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास अभ्यासून मार्ग ठरवते आणि आम्ही रक्‍ताचे मराठे आज तुटपुंज्या देशाचा दहशदवाद गेली ५० वर्षे सहन करतो आणि सतत अपयशी ठरतो…त्याच्या डोक्यात आग लागली होती. तो दिल्लीत आला. परिषदेतील सर्व बाबी त्यांनी अधिकार्यांना सांगून ३ महिन्यांची रजा मागून घेतली. दिल्लीत बऱ्याच ग्रंथालयात त्याने बहिर्जी नाईक यांच्याबद्दल माहिती मिळते का पहिल्री, पण जेमतेम माहितीशिवाय काही हाती लागले नाही. ३ महिन्यांच्या सुट्टीवर तो त्याच्या जन्मगावी पलूस येथे आला. घरी आल्यानंतर त्याला आतुरता होती…….बहिर्जी नाईकांच्या समाधी दर्शनाची. ▶घरी आल्यानंतर त्याला आतुरता होती…….बहिर्जी नाईकांच्या समाधी दर्शनाची. बानूरगड …. जे पल्रूस पासून वीस-बावीस किलोमीटर वर आहे तो प्राचीन किल्ला. त्याने सकाळीच बुलेट ला किक मारली आणि थेट बाणूरगड गाठला. वासरू जसे गाईसाठी क...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - ४९ ⚔️ ▶ थंडीचे दिवस असल्यामुळे गव्हाच्या गरम कांजीचे बदाम, पिस्ते सोडलेले कटोरे घेऊन एक खिदमतगार आत आला. मिर्झा राजासमोर कटोऱ्याचे तबक चौरंगावर ठेवून निघून गेला. मिर्झाने दोन कटोरे उचलले. त्यातील कांजी एकमेकांत ओतून पुन्हा कटोरे सारख्या शिगेचे केले. गरम वाफा वर उफाळल्या. त्यातील एक कटोरा संभाजीराजांच्या हाती देत मिर्झा म्हणाला, “लीजिये छोटे राजासाब।” संभाजीराजांनी कटोरा हाती घेतला. गरम कांजीचा एक सुखावह घुटका घेत मिर्झा राजा म्हणाला, “छोटे राजासाब, इस बक्षीके डेरेमें जाना। रिवाजकी हर बात ध्यान देकर सुनना। फर्मान अदबसे अपनाना। समझदार हो। सब ठीक होगा।” कांजीचा घुटका घ्यावा म्हणून संभाजीराजांनी कटोर ओठाला लावला होता. पण त्याचा चटका बसल्यामुळे त्यांनी तो तसाच झटकन खाली घेतला! हातांतील कटोऱ्याकडे बघताना त्यांना आपल्या आबासाहेबांची आठवण झाली. त्यांनीही रिवाज सांगितला होता, दसऱ्याच्या आखाड्याचा. कडी-मोहरा बहाल करण्याचा. मिर्झाही रिवाज सांगत होता, 'अदब राखण्याचा! ' “ठुंडी होने दीजिये।” मिर्झा संभाजीराजांच्या कटोऱ्याकडे बघत, पुढे झ...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - ४८ ⚔️ ▶ जगदंबेसमोर एका हारीत पूजलेल्या हत्यारावरील आपली ग्यानबंद जमदाड संभाजीराजांनी वाकून उचलली. भगवे म्यान क्षणभर कपाळाला लावले. मुठीचा परजात हात चढवून त्या जमदाडीचे पाते सर्रकन बाहेर खेचले. हत्याराची झगझगीत शिकल डोळ्यांत भरून घेतली. आणि पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊसाहेंबांना एकदा नजर दिली. जिजाऊ नुसत्याच प्रसन्न हसल्या. आपोआप त्यांच्या उजव्या हातीचे हत्यार डाव्या हाती गेले. मान नागफण्यासारखी ताठ झाली. आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांनी क्षणात हत्याराच्या लखलखीत धारेवरून सर्रकन ओढला! अंगठ्यावर रक्ताचे कोंभ तरारत उठले होते! रक्तमंडित आपला राजअंगठा संभाजीराजांनी जगदंबेच्या चरणांजवळ नेला. जगदंबेच्या पायाखाली रगडल्या जाणाऱ्या मिया सतचया गच्या मस्तकावर संभाजीराजाच्या उष्ण रक्ताचे दोन थेंब स्थिरावले. “नवरात्रा'त पूजलेले आपले हत्यार त्यांनी “पाजून' घेतले! मग हाताच्या अंगठ्यावरच्या रक्ताचाच भंडारा करून संभाजीराजांनी त्याने कपाळावरच्या शिवगंधाचा मळवट भरून घेतला! हातातील पाते म्यानबंद करून जमदाडीचे भगवे फासबंद कमरेला आवळून घेतले. त्यांच्...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४२ ⚔️ ▶तिच्याकडून खूप काही शिकून घेतले त्याने, १० दिवसात त्यांची अतिशय घनिष्ट्य मैत्री झाली होती. पण, ३ वर्षानंतर आजही साराह ने बाजीराव ला ओळखले. बाजीराव आणि साराह दोघानाही आपापल्या देशात जाण्याची घाई होती पण अजूनही २-३ तास अवकाश होता, त्यांनी एकत्र कॉफी घेण्याचे ठरवले आणि ते एका हॉटेल मध्ये गेले. कॉफी घेत दोघांच्या चर्चेला सुरवात झाली. बाजीराव म्हणाला… साराह..तू इतक्या वर्षानंतर मला अचूक कसे ओळखलेस ? मला तर वाटले ज्याला सारे जग घाबरते अश्या गुप्तहेर संघटनेची एक वरिष्ठ अधिकारी स्वताच्याच गुर्मीत असेलर..पण तू अजूनही मला लक्षात ठेवलेस…नवल आहे. किंचित स्मितहास्य करत साराह बोलली… अरे, असे नको बोलू रे…जगात सर्वाना आम्ही विसरतो मात्र भारतीयांना कधीच नाही. कारण, आमचे ज्यू लोक साऱ्या जगात विस्थापित झाले पण जिथे तिथे त्यांच्यावर फक्‍त अन्यायच झाला होता. ▶एकमेव भारत असा देश आहे जिथे ज्यू धर्मीय सुखासमाधानाने आहेत. आज आमचा देश सर्व बाबतीत बलाठ्य होत आहे, आम्ही जगभरात विस्थापित ज्युना परत देशात या असे आवाहन करतो, बरेच लोक आलेही, पण भारतातील ज्यू म्हणतात आता भारत हाच आम...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४१ ⚔️ ▶सखाराम व त्याचे सवंगडी वस्ताद काकासोबत त्या भयानक जंगलात प्रवेशले होते, आणि त्याना पाहताच जंगलात पशु पक्षांनी कोलाहल माजवला होता. कोणाला समजेना नक्‍की काय होत आहे…पण, वस्ताद काकांनी ताडले की आपण कुठे आलो आहोत… त्यांच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले.. बाजींद…बाजींद……. ई.सन.२०१३ बानुरगड, सांगली तहान भक विसरून बाजीराव ही चित्तथरारक कथा किसन धनगराच्या तोंडून ऐकत होता. एव्हाना जवळपास सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता. आकाशात पावसाळी ढगांची गर्दी कमी झाली होती, मात्र श्रावणातील तुरळक सारी मात्र अधून मधून किल्ले बाणुरगडावर तुषार शिंपडत होत्या. बाजीराव जाधव हा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील पलस गावचा एक तिशीच्या वयाचा युवक. अखंड देशसेवा करणाऱ्या जाधव घराण्यात त्याचा जन्म झाला. वयाच्या १६ व्या वर्षीच त्याने भारतीय सैन्यदलात नोकरी स्वीकारून देशसेवेचे अखंड व्रत अव्याहतपणे जपले.१९९९ साली कारगिल च्या लढाईत त्याने त्याच्या पराक्रमाची चणूक दाखवली. त्याच्या या कामगिरीवर खश होऊन भारत सरकारने त्याला शौर्य पदक दिले आणि वरिष्ठ पदावर नेमणूक केली. ▶चौकस बुद्धी, धाडस, शोर...