सर्वाना माझ्याकडून दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिपावली आपणास तसेच आपल्या परिवारास आनंदाची ,भरभराटीची , सुख समृद्धीची जावोत हीच देवांचे देव महादेवां चरणी प्रार्थना ! .
☀ वसुबारस म्हणजेच दीपोत्सवास खर्या अर्थाने प्रारंभ
🌺 वसुबारस (गोवत्स द्वादशी) 🌺
☀इतिहास : समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.
☀उद्देश : या अन् पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरिरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावे.
☀ सण साजरा करण्याची पद्धत : या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.
गोमातेला करावयाची प्रार्थना !
🙏प्रजापती ब्रह्मदेव, विष्णु आणि महादेव या प्रमुख देवतांनी गायींची स्तुती करतांना म्हटले आहे,
🌺त्वं माता सर्व देवानां त्वं च यज्ञस्य कारणम् ।
त्वं तीर्थ सर्वतीर्थानां नमस्तेस्तु सदानधे ।
☀अर्थ : हे पापहरिते ! तू सर्व देवतांची माता आहेस. तूच यज्ञाचे कारण आहेस. सर्व तीर्थांचे तू महातीर्थ आहेस.
तुला सदा नमस्कार असो.
☀सत्त्वगुणी, आपल्या सहवासाने दुसर्याला पावन करणार्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणार्या, श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या आणि सर्व देवांनी तिच्यात वास्तव्य करावे, अशी योग्यता असलेल्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात.
☀ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण-संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याविना रहात नाही. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला प्रारंभ होतो.
🌸 गोवत्स द्वादशी 🌸
🙏गाय दुष्ट शक्तीचे निर्मूलन करणारी असल्याने तिची पूजा करणे आवश्यक असणे : या दिवशी गाय आणि तिच्या वत्साची पूजा करतात. गाय हा प्राणी सत्त्वगुणी आहे. तिला आपण माता म्हणतो.
🙏तिच्या ठिकाणी ३३ कोटी देवता वास करतात.
🙏 तिची सर्व इंद्रिये आणि आतील भाग हा दैवी शक्तीने संपन्न असल्यामुळे तिच्यातून होणारे उत्सर्जन शुद्ध असते.
☀या उत्सर्जनातून मिळणारे गोमूत्र, गोमय (शेण) आणि दूध हे पवित्र असून दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारे आहे. त्यात दुर्गंध नसतो, ही याची विशेषता नाही का ? गाय दुष्ट शक्तीचे निर्मूलन करणारी आहे; म्हणून तिची पूजा करायची असते. -
☀गायीच्या तुपामुळे अन्नपचन लवकर होऊन, ते मेंदूतील सूक्ष्म नाड्यांमध्ये जाऊन शांती निर्माण करते. म्हशीचे तूप सहजतेने पचत नाही. -
आज वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात.
घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.
नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.
निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.
ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.
स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.....
भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
वसुबारस, धनत्रयोदशी, नकरचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणशंनी दिवाळी साजरा केली जाते. घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भयनिवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे.
वसुबारस दिवशी गायीची पाडसासह सायंकाळी पूजा करतात. सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.
ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
वसुबारस साजरा करण्यामागे अजून एक गंमतशीर माहिती अशी सांगितली जाते की, दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणाली तापमान वाढ होते. हे टाळण्यासाठी म्हणून १०० कोटी देव जिच्यात सामावले आहेत अशी ही आपली गाऊमाताचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवाच्या दैवी किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे. गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभु प्रतिनिधित्व करते आणि म्हणून या दिवशी उपासना आहे.
दिवाळीच्या कोटी कोटी शुभेच्छा...!!!
✍ लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.
🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃

Comments
Post a Comment