ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष  ⛳

▶️ १५ जानेवारी इ.स.१६५६
(पौष वद्य ४ चतुर्दशी शके १५७७ संवत्सर मन्मथ वार मंगळवार)

महाराजांनी छापा घालुन जावळी काबीज केली.
           महाराजांच्या बळापुढे चंद्रराव मोरे यांचे बळ अपुरे पडू लागले. चतुर्बेट संभाजी कावजी कोंढालकर यांच्या हाती पडले. जोहोरखोरेही रघुनाथपंतांनी काबीज केले. हणुमंतराव मोरे या धुमश्चक्रीत मारला गेला. तर प्रतापराव मोरे निसटून विजापूरला पळून गेला. सिवथर खोरेही महाराजांनी जिंकले. इथल्या बाबाजीराऊ या मोरे यांचा कारभारी याला कैद करून महाराजांनी त्याचे डोळे काढले. खासा चंद्रराव व मुरारबाजी यांनी जावळी बराच वेळ लढविली. पण अखेर चंद्ररावास माघार घ्यावी लागली. तो आपल्या बायकामुलांसह रायरी किल्ल्यावर लपून बसला. जावळी महाराजांनी सर केली. जावळीवर महाराजांचे निशाण लागले तो दिवस होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १५ जानेवारी इ.स.१६८१
(माघ शुद्ध ६ षष्ठी शके १६०२ संवत्सर रौद्र वार शनिवार)

राज्याभिषेकाचे तुलादान विधी!
         राज्याभिषेकाचे तुलादान विधी पार पडले. त्याजबरोबर विधीवत करावयाचे अनेक विधी जसे विनायक शांती व इतर धार्मिक वेदोक्त विधी आजच्या दिवशी पार पडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १५ जानेवारी इ.स.१६८४
शहजादा मुअज्जम (उर्फ) शहाआलम रामघाट ओलांडून कुडाळ, बांद्यावरून डिचोलीस पोहोचल्याची पोर्तुगीज कागदपत्रांची नोंद! मोगल सैन्य डिचोलीस पोहोचल्यावर त्यांनी डिचोली शहराचा विध्वंस तर केलाच पण एक (गोवेकर बिशन दोमांतेऊस द काश्त याने बांधलेले) कॅथलिक मंदिर उध्वस्त केले. डिचोलीला किल्ला नव्हता. तेथील सुभेदाराच्या अखत्यारीतील भतग्राम, साखली (सत्तर), मणेरी, बांदा, पेडणे हा प्रदेश होता. डिचोली शहर पेटवून देऊन मोगलसेना भातग्राम नारवे तीरावर आली. डिचोली जवळील पिंपळगाव येथील राममंदिर मोगलांनी उध्वस्त केले. नारवे क्षेत्रातील सप्तकोटीश्वर मंदीराससुद्धा उपद्रव केला. व कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले येथेसुद्धा उपद्रव केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १५ जानेवारी इ.स.१६८५
गाजीउद्दीनखान बहादूर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी भिडला. गाजीउद्दीनखानाने रायगडाच्या पायथ्याची एक वाडी जाळली. मराठ्यांचे अनेक अधिकारी व सैनिक त्यावेळी मारले गेले. कवी कलश याने सैन्य पाठवून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मोगली सैन्याने बरेच लोक बायकामुलांसह कैद केले. केली. छत्रपती संभाजी महाराज त्यावेळी पाचाडात होते. गुरे-ढोरे जप्त केली. निजामपूर व जवळील ३ ठिकाणी जाळपोळ मोगली सैन्य तिकडे येत आहे हे समजल्यावर ते रायगड किल्ल्यावर गेले. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाडजवळ ४ मैलांच्या (सुमारे ७ कि. मी. च्या) अंतरावर गाजीउद्दीनखानाचा डेरा होता. छत्रपती संभाजी महाराजांची १५ हजारांची सेना घेऊन हंबीरराव व रुपाजी भोसले हे मोगली सैन्यावर तुटून पडले. बाण आणि बंदुकीची लढाई झाली. चारही बाजूंनी मोगली सैन्य लढत होते. पण मराठे सुद्धा तितकेच तीव्रपणे लढत होते. मोगलांनी भरपूर लुट मिळविली आणि ते कोथळा गडाच्या परिसरात गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १५ जानेवारी इ.स.१७२९
भवानीराम उज्जैनची राखन करत बसला आणि मराठी फौजा उज्जैनच्या चौफेर वसुली करत हिंडावयास लागला. कालियादह सोडून अप्पा कायथ-शाह शहाँपुरावरून आला. मराठी फौजांना आवर घालण्यास तेथे फार सेना नव्हती. अप्पांच्या फौजेने सधन सिरोंज, अहिरवाड्याकडे निघाली! सारंगपूर लुटून भवताल उजाड केला. तेथून मराठी फौजा बादशहा मुहम्मदशहाने नजिमुद्दीनखानाला भवानीरामाच्या मदतीसाठी पाठवले होते. तो सिरोंजला होता. आता बादशहाने भवानीरामाला सांगण्यात आले होते. मराठ्यांनी एकून रागरंग ओळखून सिरोंज सोडून कोटा-बुंदीकडे आपला मोर्चा वळवला! ते १० १२ दिवस मराठी फौजा कोटा-बुंदीच्या आसपास फिरत होत्या. त्यात राजगढाच्या राजाकडून त्यांनी चौथाईची वसुली केली!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

#पानिपतचे_तिसरे_युध्द
▶️ १५ जानेवारी इ.स.१७६१
रोजी मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ" आणि अफगाण घुसखोर अहमद शहा अब्दाली यांच्यातझाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा,अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १५ जानेवारी इ.स.१९१९
कोल्हापूरचे"राजर्षि शाहू महाराज" यांनी आदेश काढुन स्प्रुश्य-अस्प्रुश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था करुन दीली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments