ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️ १७ जानेवारी इ.स.१६४५
छत्रपति शिवरायांनी दादाजी नरस प्रभुना पत्र पाठवले.
रोहिड व वेलवंड भागाचे कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे शिवरायांबरोबर उठावात सामिल झाले,यामुले विजापुर दरबाराने त्याना जरबेचे पत्र पाठवले,त्यामुळे हवालदिल झालेल्या दादाजिना शिवरायांनी पत्र पाठवून स्वराज्यात सामिल होण्याचे आवाहन केले...!!!
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▶️ १७ जानेवारी इ.स.१६४८
आदीलशहा बादशहाने "नवाब मुस्तफाखान" यास हुकूम दीला की कर्नाटक मध्ये जाऊन त्या बगावतखोर "शहाजी भोसले" ला गिरफ्तार करा. "नवाब मुस्तफाखान" आणि "बाजी घोरपडे" प्रचंड फौज घेऊन विजापूरहून "किल्ले जिंजी" कडे निघाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▶️ १७ जानेवारी इ.स.१६६३
(माघ वद्य ४ चतुर्थी शके १५८४ संवत्सर शुभक्रृत वार शनिवार)
इंग्रज कैद्यांची सुटका!
छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच इंग्रजांच्या धोरणाचा पत्ता होता... व्यापाराआड देशात हातपाय पसरायची निती शिवरायांना माहीत होती.. अशातच महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकले असता महाराजांवर, पन्हागडावर तोफा डागण्यात रेव्हिंग्टन, गिफर्ड हे आघाडीवर होते. त्यामुळे पुढे संधी मिळताच महाराजांनी या हरामखोर इंग्रजांना पकडुन कैदेत टाकले. रेव्हिंग्टन आणि गिफर्ड हे कैदेत पडून ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला होता. मात्र पुढे रेव्हिंग्टन आजारी पडल्यामुळे त्याची काही अटींवर महाराजांनी सुटका केली पण इतरांना सोडायला मात्र, महाराज तयार नव्हते... याच काळात राजापूरचा व्यापार पण ठप्प झाला होता. सुरतेचा अधिकारी प्रे. अँड्रूजने शेवटी शरणागती चे बोलणे राहुजी सोमनाथ यांच्याकडे लावून आणि जंजिरेकर सिद्द्यांविरुद्ध मदतीची तयारी करण्याचे आश्वासन घेऊन किल्ले रायगडाहून इंग्रज कैद्यांची सुटका करण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १७ जानेवारी इ.स.१६६६
(पौष वद्य ७ सप्तमी शके १५८७ संवत्सर विश्वावसू वार बुधवार)
नेतोजी पालकर यांना सेनापती पदावरून दूर केले. पन्हाळ्याच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या फौजेचे दोन भाग केले. एक तुकडी स्वतःकडे ठेवली तर दुसरी नेताजींना दिली. "अदिलशाही मुलुख मारत आम्हास पन्हाळ्यास आजपासून पाचव्या दिवशी पन्हाळ्याच्या पायथ्याशी हजर व्हा" असा आदेश दिला!
तरिही नेतोजी पालकर वेळेवर हजर झाले नाहीत. मात्र या चकमकीत हकनाक १००० सैनिकांची कत्तल झाली! प्रतिशिवाजी म्हणून लौकिक असलेल्या नेतोजी पालकर यांची शिस्तभंगाच्या मुळे सेनापती पदावरूनच नाही तर स्वराज्यातून हकालपट्टी करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नेतोजी पालकरांचा, त्यांच्या सेनापतीपदाचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता, नेतोजी पालकरांना सेनापती पदावरून तडकाफडकी दूर केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▶️ १७ जानेवारी इ.स.१६८८
किल्ले पट्टागड मोगलांकडे!
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यातील अकोल्याच्या वायव्येस १६ मैलावर किल्ले पट्टागड आहे. अत्यंत मजबूत स्थितीतील हा गड घेण्यासाठी मातबरखानाने प्रयत्न चालवले होते. फंदफितुरी करून गड घेण्यासाठी माहीर असलेल्या मातबरखानाने इ.स.१६८८मध्ये औरंगजेबाकडे पाठविलेल्या एका पत्रात उल्लेख केला आहे की, १००० कोळी, भिल्ल व मावळे मी मराठ्यांच्या नोकरीतून बादशहा औरंगजेबाच्या नोकरीत घेतले आहेत.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment