ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶📜 १९ जानेवारी इ.स.१५९७
#महाराणा_प्रताप_यांचा_स्मृतिदिन
(जन्म ९ मे १५४०)
राणा प्रतापसिंह गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. अकबराचे स्वामित्व न पतकरल्यामुळे त्यास मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठविले. २१ जून १५७६ रोजी हळदीघाटच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो तीतून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रतापला न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापने आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्याने पुढे १२ वर्षे शांततेने राज्य केले. ह्यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत ह्या दोन ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे. राणाप्रतापास परचक्राची फार चिंता होती. म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. कर्नल टॉड म्हणतो, ‘प्रतापचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन जुलमी राजसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विझेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल.’

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १९ जानेवारी इ.स.१६३६
निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने शहाजहान निघाला होता. त्याने हांडियाजवळ नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १९ जानेवारी इ.स.१६६५
(माघ शुद्ध १३, त्रयोदशी शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार गुरुवार)

मिर्झाराजे जयसिंग आले!
९ जानेवारी इ.स.१६६५ मिर्झाराजे जयसिंगांनी हंडीया घाटातून नर्मदा ओलांडली अन् १३ जानेवारी इ.स.१६६५ ला ते बुर्हानपुरास पोहोचून वेळ न दवडता पुढे कुच कुच केले. मिर्झाराजे जयसिंगांनी बर्हाणपुर सोडून औरंगाबादच्या दिशेने प्रवास सुरू केला.मिर्झाराजे जयसिंगांनी पहिल्या प्रवासात कुठेही वेळ दवडला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ १९ जानेवारी इ.स.१६८२
(माघ वद्य षष्ठी, शके १६०३, संवत्सर दुर्मती, वार गुरुवार)

सिद्दी कासीम हा पावसाळा तेथेच काढील या भितीने मुंबईकर चिंतातुर झाले आणि मुंबईकरांनी सुरतकरांना कळविले की "सिद्दीचे आरमार मुंबई बंदरात येत आहे आणि सिद्दीवर छत्रपती संभाजी महाराज फारच, क्रृद्ध झाला असून सिद्दीवर छत्रपती संभाजी महाराज तुटून पडणार आहेत. तेव्हा सिद्दीला पावसाळ्यात मुंबई बंदरावर ठेवणे, आपणास त्रासदायक ठरेल तेव्हा त्यास तेथून हालविण्याबाबत निर्णय करावा."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १९ जानेवारी इ.स.१६८२
(माघ वद्य षष्ठी, शके १६०३, संवत्सर दुर्मती, वार गुरुवार)

दंडाराजपुरीवर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रखर हल्ले!*
दंडाराजपुरीवर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रखर हल्ले सुरूच होते. समुद्रावर ख्रिस्ती, हबशी सत्ता नामशेष करण्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी ठरविले होते. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करून छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार मराठी सैन्य दंडाराजपुरीवर तुटून पडले होते. 'याचा सर्वात जास्त त्रास इंग्रजांना होत होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments