ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️📜 २१ जानेवारी इ.स.१६६२
शिवरायांचा कोंकणांत अमल !
शके १५८३ च्या माघ शु. १२ रोजी श्रीशिवाजीमहाराज यांनीं तळकोंकण काबीज करून तेथे आपला अमल बसविला.
विजापूर दरबारने अफझलखानास आपल्यावर पाठविले याबद्दल शिवाजीच्या मनांत राग होता. त्याचा सूड घेण्यासाठी कल्याणपासूनच्या दक्षिण किनाऱ्यावर त्यांनीं आपले लक्ष वेधवून घेतले. आदिलशहाच्या ताब्यातील तेथील प्रदेश सोडवावेत व पश्चिमेकडील व्यापान्यांचाहि बंदोबस्त करावा असा दुहेरी हेतु शिवाजीचा होता. दाभोळ, राजापूर, कारवार इत्यादि धनाढ्य बंदरांच्या आश्रयास राहून युरोपियन व्यापारी सिद्दीस मदत करीत. तेव्हां त्यांची ही ठाणे उठवणे अगत्याचे होते. म्हणून शिवाजीची स्वारी आतां या उद्योगास लागली. कोंकणांतील श्रीमंत शहरे व पेठा हस्तगत केल्या. निजामपूर, दापोली, पालवण, संगमेश्वर वगैरे ठिकाणे हस्तगत केली. पुढे शिवराय राजापुरास आले. तेथील इंग्रजांची वखार लुटून उपद्रव देणाऱ्या सहा इंग्रजांना त्याने कैदेंत ठेविलें. सर्वे प्रदेश ताब्यात आल्यावर प्रचितगड, पालगड, मंडनगड हे किल्ले त्यांनी नवीन बांधले. सर्वत्र शिवरायांचे वर्चस्व प्रस्थापित होऊन तळकोंकण महाराजांस अजोंनी झालें.
कोंकण हस्तगत झाल्यावर शिवाजीची फौज दाभोळवर आली. या संपन्न बंदरांत अफझलरवानाची तीन जहाजे होती. ती घेऊन तेथील अमलदार राजापुरास पळून गेला. खानाची तन जहाजें इंग्रजांच्या आश्रयास गेली. इंग्रज सुखासुखी जहाजे शिवाजीकडे देत नव्हते. अफझलखानाची दुर्दशा सर्वत्र जाहीर झाली होती. शिवाजीचें नांव ऐकतांच भीतीने वग्वारीचा मुख्य रेव्हिंग्टन हा बंदर सोडून भर समुद्रांतून पळून गेला. पुढे रॅडॉल्फ टेलर, रिचर्ड टेलर, गिफर्ड इत्यादि इंग्रजांनी काही आगळीक केली म्हणून शिवाजीनें त्यांना कैदेत ठेविलें, शिवाजीच्या अधिकार्याने इंग्रजांना कळविलें, " महाराजांस सिद्दीचे ताब्यांतून दंडा राजापुरी घ्यावयाची आहे, त्या कामी तुम्ही मदत करीत असाल तर तुम्हास मोठे बक्षिस देऊं, नाही तर दंड भरल्याशिवाय तुमची सुटका व्हावयाची नाही."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २१ जानेवारी इ.स.१६७५
छत्रपती श्री शिवरायांनी कुतुब खानाचा पराभव केला. छत्रपती श्री शिवरायांनी बऱ्हाणपूर,धरणगाव ठाण्याची लुट करून परत रायगडाकडे येत असताना महाराजांना रोखण्यासाठी मोगली सेनापती कुतुब खान चालून आला. पण मराठ्यांचा जोर विलक्षण होता. कुतुब खानाचे ४०० सैनिक ठार झाले. प्राण भयास्तव कुतुब खान व मोगली सैन्य औरंगाबाद कडे पळून गेले. प्रचंड लुट घेऊन महाराज रायगडी परतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २१ जानेवारी इ.स.१७४०
स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), "..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये"! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), "ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही"! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २१ जानेवारी इ.स.१७६१
थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🚩🏇
▶️ २१ जानेवारी इ.स.१८०५
होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २१ जानेवारी इ.स.१८१९
वीर नोवसाजी मस्के नाईकांचे स्वातंत्र्य युद्ध -
हे नोवाहचे युध्द दिनांक ८ जानेवारी १८१९ ते ३१ जानेवारी १८१९ पर्यंत चालले. २१ जानेवारी ला हाटकरांच्या उठावासंबंधी लेफ्टनंट रौबर्ट पिटमन याने ब्रिटीश अधिकारी हेन्री रसेलला लिहिलेल्या पत्रात नोवासाजी नाईकांच्या गनिमी युद्धनीतीचा उल्लेख केला आहे. "१९ तारखेच्या रात्री १० वाजता नोवसाजीच्या सैन्यातील २०० घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी माझ्या लष्करी छावणीच्या मागील बाजूस असलेल्या रक्षकावर गोळीबार केला. ते हल्ला परतवत होते, लेफ्टनंट सुथरलैंड यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले, आणि काही मैलांपर्यंत त्यांचा पाठलाग केला, परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले." निजामाच्या ५,००० सैन्याविरुद्ध हाटकरानी निकराचा लढा दिला होता. या संपूर्ण युद्धात हटकरांकडील ५०० अरब, ८० पेक्षा जास्त अतिजखमी आणि ४०० योद्धे शहीद झाले. तसेच, हैद्रबाद सरकारकडचे १८० सैनिक जखमी आणि २४ मारले गेले. जखमींमध्ये ६ युरोपीय अधिकारी होते. या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळानंतर सर्व हटकर नाईकांना पकडून फाशीवर देण्यात आले. नोवसाजी यांना दगा करून पकडण्यात आले. ब्रिटिशांच्या दृष्टीकोनातुन हे युध्द इतके महत्त्वपूर्ण होते कि नंतर रेजिमेंटमध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटली गेली. ३१ जानेवारी १८१९ ला हाटकरांचे हे युद्ध संपल्याची माहिती मिळते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment