ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️ २८ जानेवारी इ.स‌.१६४५
छञपती शिवरायांनी "शिवगंगा" खोऱ्यातील "रांझे" गावचा पाटील "बाबाजी भिकाजी गुजर" याचे दोन्ही हात-पाय कापुन टाकण्याची शिक्षा सुनावली व त्याची पाटीलकी जप्त केली. कारण त्या पाटलाने गावातल्या एका गरीब शेतकऱ्याच्या तरुण मुलीला दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष पळवुन तिच्यावर बलात्कार केला, अब्रुच्या भितीने तिने जिव दिला. सारा गाव हळहळला पण मुका राहीला. शिवरायांच्या कानी ही गोष्ट आली ते साल होतं १६४५ आणि महाराजांचं वय होत १५. या वयात महाराजांनी मुजोर बाबाजीला पकडुन आणले व खटला चालवुन त्याचा चौरंगा(दोन्ही हात-पाय तोडणे) केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ २८ जानेवारी इ.स.१६६०
२८ जानेवारी १६६० या दिवशी खान औरंगाबादहून निघाला. खानासोबत ७७००० घोडदळ, हत्ती बकसर, तिरंदाज, बरखंदाज, आड़हत्यारी, बाजारबुणगे, दारूगोळा, बाणांच्या भांडत्या, आरबा, उंटांचा तोफखाना, पायदळाची तर गणतीच नाही! असे अमर्याद सैन्य, बेमोहिन रुपे, होन, मोहरा, ऐसे ३२ कोटी द्रव्य घेऊन खान रजियावारी चालून आला, खानची स्वारी म्हणजे जणू कलयुगाच्या रावणाचीच खानासोबत असलेले उत्तम आघाडीचे पदाती घेऊन सरदार अंबिकानगर वरून पुरंदर ,शिरवळ कडे निघाला. एवढं सैन्य घेऊन येतोय म्हणजे तो शांततेत आला नाही. नासधूस करतच चाललेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ २८ जानेवारी इ.स.१६६४
मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली. रेव्ह. जॉन एस्कॅलियट याने २८ जानेवारी १६६४ रोजी सर टॉमस ब्राऊन यांना लिहिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांचे वर्णन आले आहे. पत्रात लिहिले आहे,

kk .., His person is decribed by them who have seen him to bee of meane stature, lower some what then I am, errect and of an excellent proportion, active in excerisise, and when ever hee speaks seems to smile, a quicke and peercing eye, and whitter than any of his people...!ll

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ २८जानेवारी इ.स.१६८१
बुऱ्हाणपूरवर छापा...
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोनदा छापा टाकला हे आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ २८ जानेवारी इ.स.१८५१
दुसरा बाजीराव पेशवे यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments