ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️३ जानेवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवरायांनी मॉंसाहेब जिजाऊंची सुवर्णा तुला केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
https://youtu.be/6Ror3YRimeU
▶️ ३ जानेवारी इ.स.१६७१
(माघ शुद्ध त्रृतीया शके १५९२ संवत्सर साधारण वार मंगळवार)
महाराज आक्रमक !
इ.स.१६७० नंतर महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगच्या बरोबरचा तह मोडून तहात गमावलेले किल्ले आणि प्रदेश पुन्हा स्वराज्यात घेण्यास सुरुवात केली. अत्यंत आक्रमकपणे किल्ले सिंहगड घेऊन औरंगजेब आणि मोगलांना आव्हान देत रणशिंग फुंकले. म्हणूनच त्याला प्रत्युत्तर म्हणून औरंगजेबाने महाराजांना रोखण्यासाठी महाबतखानाची नेमणूक करून, दक्षिणेचा सेनापती म्हणून पाठविले व त्यासोबत जसवंतसिंहाची नेमणूक केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ३ जानेवारी इ.स. १६८२
इ. स. १६८१ च्या डिसेंबरमध्ये सिद्दीने मराठ्यांची आपटे व नागोठणे ही गावे लुटली आणि जाळली. जंजिरेकर सिद्दीच्या ह्या अशा कृत्यांचे छत्रपती संभाजी महाराजांनी लपंडाव करून जंजिरा हस्तगत करण्याचे ठरवले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कोंडाजी फर्जंद यांना सिद्दीकडे नोकरी मिळवण्यास पाठवले. त्यात ते यशस्वी झाले आणि आपल्या कुटुंबांसह जंजिरा किल्ल्यात राहू लागले. जंजिऱ्यावरील दारूखाना इत्यादींना आग लावून देण्याचा त्यांचा विचार होता. कोंडाजी फर्जंद यांचा हा डाव सिद्दीस कळला तेव्हा सिद्दीने त्यांचे डोके मारले. त्यांच्या सोबत असणाऱ्या काही लोकांना बुडविले. [चिटणीस, संभाजी बखर, पृ.१७.] दगलबाजीने जंजिरा सर करण्याचा प्रयत्न अयशस्वी होताच संभाजी महाराजांनी दादाजी रघुनाथ देशपांडे या सेनापतींस दंडाराजपुरीस वेढा घालण्याकरता पाठवले. नंतर, संभाजी महाराज, राजपुत्र अकबर हे वीस हजार सैनिकांसह रायगडाहून निघाले आणि वेढा घालून राहिलेल्या सैनिकांस येऊन मिळाले. ह्या सैन्याने [आवळसकर, ऐतिहासिक साधने, पत्र क्र. ६४, पृ. ९९.] पंधरा दिवस सतत जंजिऱ्यावर तोफा डागल्या. तोफांच्या भडिमारामुळे किल्ल्याची भिंत कोसळून पडण्याची वेळ आली. दिनांक ३ जानेवारीपासून दिनांक ३ फेब्रुवारी १६८२ ह्या काळात संभाजी महाराजांनी सिद्दीवर अतिशय दबाव आणला होता, सिद्दीला अडचणीत टाकले होते आणि त्यावेळी मराठे जंजिरा जिंकून घेण्याच्या बेतात होते. त्याकरिता त्यांनी किल्ल्याभोवती खंदक भरून काढण्याकरता ५० हजार माणसे कामास लावली. आठशे यार्ड रुंद आणि तीस यार्ड खोल असणारा खंदक दगड, लाकडे, कापसाची गाठोडी वगैरे टाकून त्यांनी भरून काढला. अशाप्रकारे किल्ल्यावर चाल करून जाणाऱ्या आपल्या सैनिकांकरता त्यांनी रस्ता तयार केला. [सरकार, हिस्टरी ऑफ औरंगजेब, खंड ४, पृ. ३१२.] परंतु, औरंगजेबाचे दोन हजार घोडदळ आणि पंधरा हजार पायदळासह नबाब हसन अलिखान याचे मोगल सैन्य ४ फेब्रुवारी १६८२ रोजी कोकणात येऊन थडकले. [सरकार, हाऊस ऑफ शिवाजी, पृ. २२३] दिनांक ३० जानेवारी १६८२ रोजी मोगलांनी कल्याण जिंकून घेतले. त्यामुळे संभाजी महाराजांना सिद्दीवरील मोहीम महाडच्या दादाजी प्रभू देशपांडे यांच्यावर सोपवून मोगल सेनेशी मुकाबला करण्यासाठी रायगडावर परत यावे लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
३ जानेवारी इ.स.१६८४
मराठ्यांनी आपले वकील धावजी येथे पाठविले. व तहाची याचना केली. साराव्हाय हा निकोलाव मनुचीला वकील म्हणून बरोबर घेणार होता. पण तो आजारी पडल्यामुळे ते शक्य झाले नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा दुभाषी हिंदू असल्यामुळे विजरईचा त्याच्यावर विश्वास नव्हता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
https://youtu.be/6Ror3YRimeU
▶️ ३ जानेवारी इ.स.१७११
गोव्याच्या व्हिसेरेईने पोर्तुगालच्या राजास लिहीलेल्या पत्राची नोंद!
इ.स.१७०७ छत्रपती शाहू महाराजांचे महाराष्ट्रात आगमण झाले तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी महाराणी ताराबाईसाहेब यांनी व्हिसेरेई दों रुद्रिगु द कांश्त याला पत्र पाठवून तहाचा संदर्भ लावला होता. व्हिसेरेईने पत्रोत्तरी महाराणी ताराबाईसाहेब यांना कळविले होते की, तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी त्यांचे दुत आपणाकडे पाठवावे. परंतु ह्या वाटाघाटी पुर्ण होण्यापूर्वीच छत्रपती शाहू महाराजांकडून महाराणी ताराबाईसाहेब यांचा पराभव झाल्याने त्यांना कोल्हापूरला जाऊन पन्हाळ्याच्या किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला. पोर्तुगिजांकडून आपणाला संकटप्रसंगी मदत झाली नाही हे महाराणी ताराबाईसाहेब यांच्या मनात राहीले व पन्हाळ्याला स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी पोर्तुगिजांशी शत्रुत्वाचे धोरण अवलंबिले. "महाराणी ताराबाईसाहेब यांचे सैन्य गोव्याच्या सिमेवर गोळा झाले आहे. हे सैन्य केव्हा गोव्यात घुसेल त्याचा नेम नसल्याने 'कोंगो' येथील ठाण्याच्या मदतीला आरमार पाठवीता आले नाही".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ३ जानेवारी इ.स.१७७५
गोव्याच्या व्हिसेरेईने पुणे दरबारातील पोर्तुगिजांचे वकील नारायण शेणवी धुमे यांना लिहीलेल्या पत्राची नोंद!
"आशियाई लोक हे लांचलुचपतीला बळी पडणारे असतात. तेव्हा तुम्ही मंत्री आणि अधिकारी यांना लाच चारून त्यांना सहज वश करून घेऊ शकाल. मात्र पैशांचा व्यवहार विश्वासू माणसांमार्फत करावा".वानगी दाखल वरील अवतरण दीले आहे, त्यावरून पोर्तुगीज आणि पेशवाईतील मुत्सद्दी यांच्यामधील संबंधावर चांगला प्रकाश पडतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ३ जानेवारी इ.स.१८३१
भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या 'शिक्षिका', 'मुख्याध्यापिका' आणि पहिल्या 'शेतकरी शाळेच्या' संस्थापक "महानायिका क्राँतीज्योती सावित्रीबीई फुले यांची जयंती (मृत्यू : मार्च १०, इ.स. १८९७ पुणे)
सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments
Post a Comment